नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- माहेरून पैसे आणावेत या मागणीसाठी शहरातील वेगवेगळया भागात राहणा-या दोन विवाहीतांचा सासरच्या मंडळीकडून छळ होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत इंदिरानगर आणि अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
इंदिरानगर पोलिस ठाणे हद्दीत राहणा-या विवाहीतेस कळमशेत ता.मुळशी जि.पुणे स्थित पतीसह सासरच्या सहा जणांकडून गेल्या २०१९ पासून मानसिक व शारिरीक छळ सुरू आहे.
माहेरून २० लाख रूपये आणले नाही या कारणातून सासरच्या मंडळीकडून शिवीगाळ,दमदाटी व मारहाण करण्यात आली तसेच तिच्या अंगावरील स्त्रीधन काढून घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात पती तुषार सांगळे सह सासरच्या सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.
दुसरी तक्रार अंबड हद्दीत राहणा-या महिलेने केली आहे. पती रविंद्र मोरे (रा.दिघे ता.चाळीसगाव जळगाव) याच्यासह सहा जणांनी सन.२०१८ पासून विवाहीतेचा छळ केला. चारित्र्याचा संशय घेत संशयितांनी माहेरून पैसे आणावेत या मागणीसाठी मानसिक व शारिरीक छळ करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार देशमुख करीत आहेत.
…….