सोमवार, ऑगस्ट 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दंडा हातात घेऊन काम करण्याऐवजी पोलिसांनी आता ‘डेटा’सोबत काम करण्याची गरज…पंतप्रधान

by Gautam Sancheti
जानेवारी 8, 2024 | 12:36 am
in राष्ट्रीय
0
Narendra Modi e1666893701426

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी जयपूर येथे पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या ५८ व्या अखिल भारतीय परिषदेत सहभागी झाले. यावेळी त्यांनी नवे फौजदारी कायदे लागू होण्याबद्दल चर्चा करताना पंतप्रधान म्हणाले की हे कायदे फौजदारी न्याय व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवणारे आहेत. नवे फौजदारी कायदे, नागरिक प्रथम, प्रतिष्ठा प्रथम आणि न्याय प्रथम या तत्वानुसार तयार करण्यात आले असून ‘दंडा हातात घेऊन काम करण्याऐवजी पोलिसांनी आता ‘डेटा’सोबत काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. नव्याने लागू करण्यात आलेल्या कायद्यांमागचा भाव समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पोलीस प्रमुखांना कल्पकतेने विचार करण्याचे आवाहन त्यांनी केले. नवीन गुन्हेगारी विषयक कायद्यांतर्गत महिला आणि मुलींना त्यांचे हक्क आणि संरक्षण प्रदान करण्याबाबत पंतप्रधानांनी विशेष लक्ष केंद्रित केले. स्त्रिया निर्भयपणे ‘ कुठेही आणि कधीही, , काम करू शकतील हे सुनिश्चीत करून महिला सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्याचे त्यांनी पोलिसांना आवाहन केले.

नागरिकांमध्ये पोलिसांची सकारात्मक प्रतिमा मजबूत करण्याची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली. नागरिकांच्या हितासाठी सकारात्मक माहिती आणि संदेश प्रसारित करण्यासाठी पोलिस स्टेशन स्तरावर समाज माध्यमांचा वापर करण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिला. नैसर्गिक आपत्ती आणि आपत्ती निवारणाची आगाऊ माहिती प्रसारित करण्यासाठी समाज माध्यमांचा वापर करण्याची सूचनाही त्यांनी केली. नागरिक-पोलीस यांच्यातील संबंध मजबूत करण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याचेही त्यांनी सुचवले. सीमा भागातील गावे ही भारतातील ‘पहिली गावे’ असल्याने स्थानिक लोकांशी अधिक चांगले ‘कनेक्ट’ अर्थात संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना या गावांमध्ये राहण्याचे आवाहन केले.

भारताची पहिली सौर मोहीम आदित्य-एल १ चे यश आणि अरबी समुद्रातून अपहरण केलेल्या जहाजावरून २१ सदस्यांची भारतीय नौदलाने केलेली त्वरित सुटका अधोरेखित करत भारत जगातली महत्वाची शक्ती म्हणून उदयाला येत असल्याचे यातून प्रतीत होत असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय नौदलाच्या या यशस्वी आणि उत्तम कामगिरीबद्दल त्यांनी अभिमान देखील व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी, जागतिक आधुनिक बदलांशी जुळवून घेत आणि देशाच्या वाढत्या राष्ट्रीय सामर्थ्याच्या अनुषंगाने, भारतीय पोलिसांनी स्वतःला आधुनिक आणि जागतिक तोडीचे पोलिस म्हणून घडवले पाहिजे.

पंतप्रधानांनी विशिष्ट सेवांसाठीची पोलीस पदके यावेळी प्रदान केली आणि जयपूर इथे आयोजित तीन दिवसांच्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या परिषदेचा समारोप केला. या परिषदेला केंद्रीय गृहमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, गृह राज्यमंत्री, केंद्रीय गृह सचिव, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस महासंचालक-पोलीस निरीक्षक आणि केंद्रीय पोलीस दले/केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांचे प्रमुख आदी उपस्थित होते. गतवर्षांप्रमाणे, यावेळी देखील ही परिषद संकरित पद्धतीने (हायब्रीड मोड) आयोजित करण्यात आली होती. या परिषदेमध्ये देशभरातील विविध ठिकाणांहून विविध श्रेणीतील ५०० हून अधिक पोलीस अधिकारी उपस्थित होते. या परिषदेत, राष्ट्रीय सुरक्षेतील महत्त्वाच्या घटकांवर चर्चा करण्यात आली. यात नव्याने लागू करण्यात आलेले प्रमुख गुन्हेगारीविषयक कायदे, दहशतवादविरोधी धोरणे, डाव्या विचारसरणीचा कट्टरतावाद, उदयोन्मुख सायबर धोके, जगभरातील कट्टरतावादाविरोधातील उपाययोजना यांचा समावेश होता.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

२९,२७३ बोगस कंपन्या उघड, १२१ जणांना अटक…विशेष मोहिमेत इतक्या कोटीचे इनपुट टॅक्स क्रेडिट चुकवल्याचा संशय

Next Post

नाशिक मुंबई- आग्रा महामार्गावर बुलेट व मोटर सायकल एकमेकांना धडकल्या…चार जण जखमी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20240107 WA0347 e1704656102494

नाशिक मुंबई- आग्रा महामार्गावर बुलेट व मोटर सायकल एकमेकांना धडकल्या…चार जण जखमी

ताज्या बातम्या

Untitled 4

भारतीय संघाने इंग्लंड विरुध्दच्या अंतिम कसोटी सामन्यात ६ धावांनी मिळवला थरारक विजय

ऑगस्ट 4, 2025
accident 11

धावत्या रिक्षातून पडल्याने ५८ वर्षीय प्रवासी गंभीर जखमी…चालकाच्या हलगर्जीपणामुळे घटना, गुन्हा दाखल

ऑगस्ट 4, 2025
मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष जनतेच्या आरोग्यासाठी समर्पित योजना 1

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून नाशिक विभागातील ३,५४२ रुग्णांना ३२ कोटी ३२ लाखांची मदत

ऑगस्ट 4, 2025
SUPRIME COURT 1

ओबीसी आरक्षण, नवीन प्रभागरचेनुसारच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका

ऑगस्ट 4, 2025
fire 1

मेणबत्ती पेटवित असतांना गंभीर भाजलेल्या ८४ वर्षीय वृध्द महिलेचा मृत्यू

ऑगस्ट 4, 2025
rape

एकतर्फी प्रेमातून एकाने महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग…गुन्हा दाखल

ऑगस्ट 4, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011