इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी खालापूर टोलनाक्याच्या व्यवस्थापनाला ठाकरी बाणा दाखवत रविवारी खडे बोल सुनावले. पाच पाच किलोमीटरच्या रांगा लागल्याने राज ठाकरे स्वत: रस्त्यावर उतरले. त्यानंतर वाहतूक कोंडी सुटली. यावेळी त्यांनी रांगेत उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करुन दिला. टोल नाक्यावर नेहमीच आक्रमकपणे विरोध करणारे राज ठाकरे यांनी प्रत्यक्ष हा अनुभव घेतल्यानंतर ते चांगलेचे संतापले.
पिंपरी चिंचवड येथील १०० व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा कार्यक्रम झाल्यानंतर ते मुंबईकडे निघाले असतांना हा प्रकार घडला. टोलनाक्यावरील यलो लाइनच्या पुढे रांगा गेल्यास वाहने विना टोल सोडली जातील असे आश्वासन मंत्री दादा भुसे यांनी दिले होते. त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी राज ठाकरे यांनी टोलनाक्या व्यवस्थापकाशी चर्चा केली.
या घटनेनंतर मनसेच्या अधिकृत हँण्डलवरुन या घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्यात टोलनाक्यामुळे ५ किमीपर्यंत ट्रॅफिक खोळंबळं, अँब्युलन्सही अडकली… राजसाहेब स्वतः रस्त्यावर उतरले… आणि मग काय… ‘ठाकरी’ शैलीत कोंडी सोडवली. जनतेला दिलेला नाहक त्रास ‘राज ठाकरे’ निमूठपणे सहन करूच शकत नाहीत ! #मनसेदणका?