इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आमच्या कंपनीवर ईडीची धाड पडली. पण, अशा धाडींमुळे मी घाबरणार नाही असे सांगत राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आपला संताप व्यक्त केला. परदेशातून आल्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. काल ईडीने बारमती अँग्रो कंपनीच्या सहा ठिकाणी छापेमारी केली. आठ तास ही छापेमारी सुरु होती. त्यावर त्यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी मला ईडीची कोणतीही नोटीस आली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी ते म्हणाले की, मी चुकीचे केले असते तर मी काल सायंकाळी परदेशातून आलो नसतो. अजून १० ते १५ दिवस राहितो असतो. या आधी ज्यांच्यावर कारवाई झाली ते एक तर दिल्लीत गेले. किंवा सत्ता बद्दल झाल्याचं तरी आपण पाहिलं आहे. मी अजिबात घाबरलो नाही. लोकांना कारवाई का केली, कशी केली माहित आहे. अधिका-यांचे काहीही चुकले नाही, त्यांना जे सांगितलं जातं तेच ते करतात. येतात कागदपत्र तपासतात आणि जातात असे रोहित पवार यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेत त्यांनी देवेंद्र फडणवीस पुणे शहरात असतांना दिवसाढवळ्या गँगवार होतो. त्यामुळे त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांनाही उत्तर दिले.