इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
काल अब्दुल सत्तार आज भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी दाखवला सत्तेचा माज असे सांगत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी नेत्याविरुद्द जोरदार हल्लाबोल केला.
ते म्हणाले की, भाजप आमदाराची मस्ती इतकी की ड्युटीवर असलेल्या पोलीस जवानाच्या थोबाडीत हाणली, थेट खाकी वर्दीला हात घालण्याची हिंमत सत्ताधारी आमदार मध्ये आली कशी?
गृहमंत्री याची दखल घेणार का? पोलिस अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी भाजप आमदार सुनील कांबळे यांच्यावर कारवाई करावी, नाहीतर पोलिसांवर तक्रार न करण्याचा दबाव ही टाकला जाऊ शकतो असेही वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देतांना सांगितले.