बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकला जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सव….मंत्री आदिती तटकरे यांनी केले उदघाटन

by India Darpan
जानेवारी 4, 2024 | 3:40 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240104 WA0279 e1704363013275

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महिला व बाल विकास विभागामार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या चाचा नेहरू बाल महोत्सवाच्या माध्यमातून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी मदतच होत असते. या बाल महोत्सवाचा बालकांनी आनंद घ्यावा, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.

नाशिक येथील मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे तीन दिवसीय जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव २०२३-२४ च्या उद्घाटन प्रसंगी मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बाल विकास विभागाचे उपायुक्त चंद्रशेखर पगारे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनिल दुसाने, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील, बाल हक्क आयोगाच्या सदस्या सायली पालखेडकर, माजी आमदार जयंत जाधव यांच्यासह महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी व बाल महोत्सवात सहभागी झालेले मुले व मुली उपस्थित होते.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, मुलांना अभ्यासासोबतच कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवता यावे यासाठी विभागामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत असतात. तसेच त्यांच्यातील कलागुणांना संधी मिळण्यासाठी बाल महोत्सव व इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. आजच्या तंत्रज्ञानाच्या व मोबाईलच्या अतिवापरामुळे पालक व मुलांमधील संवाद कमी झाला आहे, कमी झालेला हा संवाद वाढविण्यासाठी विभागाच्यावतीने स्पर्धा, महोत्सव अशा विविध माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. मुलांना लहानपणापासूनच अभ्यासासोबतच त्यांना आवड असणाऱ्या क्षेत्रात संधी उपलब्ध करून दिल्यास, त्यांचा मानसिक व शारिरीक विकास होण्यास मदत होते. या बाल महोत्सवाच्या माध्यमातून आनंद घेतांना मुलांना कोणतीही दुखापत होणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, असे ही मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला पंडित जवाहरलाल नेहरू व सावित्रीबा़ई फुले यांच्या प्रतिमा पुजन करण्यात आले. त्यानंतर प्रातिनिधीक स्वरूपात अनाथ प्रमाणपत्र व माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत मुदत ठेव प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच बेटी बचाव, बेटी पढाव या दौड टी-शर्ट व टोपी लोगोचे अनावरण करण्यात येवून हवेत फुगे सोडून चाचा नेहरू बाल महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक येथे सत्यशोधक चित्रपट पाहताना मंत्री छगन भुजबळ भावूक…

Next Post

नाशिकमध्ये वेगवेगळ्या भागात राहणा-या दोन अल्पवयीन मुलीचे अपहरण, गुन्हा दाखल

India Darpan

Next Post
crime114

नाशिकमध्ये वेगवेगळ्या भागात राहणा-या दोन अल्पवयीन मुलीचे अपहरण, गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011