सोमवार, मे 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते इतक्या दिव्यांग लाभार्थ्यांना बॅटरी संचलित तीनचाकी सायकलचे वाटप

by India Darpan
जानेवारी 4, 2024 | 3:10 pm
in राज्य
0
unnamed 2024 01 04T150912.324


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दिव्यांग बांधवांसाठी उपयुक्त अशा विविध साधनांचे व उपकरण संचांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज वर्षा शासकीय निवासस्थानी दिव्यांग लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री जनकल्याण कक्षातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात २६ दिव्यांग लाभार्थ्यांना बॅटरी संचलित तीनचाकी सायकल, वैद्यकीय उपकरणांचा संच (कम्युनिटी मेडिकल किट) अशा साहित्याचे वितरण करण्यात आले.

महाराष्ट्रातील सामाजिक उत्तरदायित्व निधीतील (सीएसआर) कामांचे लोकाभिमुख नियोजन व्हावे म्हणून मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. राज्यातील या क्षेत्रातील काम अधिक वेगवान पद्धतीने जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत नेण्यासाठी हा कक्ष प्रयत्नशील आहे. त्या अंतर्गत आज या साधनांचे, उपकरणांचे वितरण करण्यात आले. आज वितरित करण्यात आलेल्या या साधनांसाठी इन्व्हेंशिया फार्मा, अंजता फार्मा, इम्युक्यूअर फार्मा आणि सँडोझ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांनी सहकार्य केले आहे. यात दिव्यांगाना केवळ प्रवासासाठी नाही तर रोजगार निर्मितीचे साधन म्हणून पर्यावरणपूरक अशा बॅटरी संचलित तीन चाकी सायकलींचे वाटप करण्यात आले. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी दिव्यांग बांधवांना वापरता येतील, अशा कम्युनिटी मेडिकल किटच्या वितरणासही प्रारंभ करण्यात आला.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नवरात्र उत्सव मंडळ यांना दिव्यांग बांधवांसाठी वापरता येतील, अशा किटस् चा समावेश आहे. यात मोजक्या पण महत्त्वाच्या निवडक उपकरणे, वस्तूंच्या संचाचा समावेश आहे. हे किट उत्सव मंडळांना आणि निवासी संकुलांकडे सुपूर्द करण्यात येतील. ज्यामध्ये वॉकर, व्हिल चेअर, स्ट्रेचर, प्रथमोपचार पेटी, ग्लुकोमीटर, टेंम्परेचर गन, पल्स ऑक्सीमीटर, रक्तदाब मोजण्याचे उपकरण, नेब्युलायझर अशा बारा वस्तूंचा समावेश आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

एसटीचे ऑनलाईन बुकींग करणे पडले महागात….वृध्दाला २ लाख ७३ हजाराला गंडा

Next Post

अल्पवयीन मुलीवर बळजबरीने बलात्कार, देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post
rape3

अल्पवयीन मुलीवर बळजबरीने बलात्कार, देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

rain1

या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

मे 19, 2025
court 1

शेजा-यावर प्राणघातक हल्ला….न्यायालयाने सुनावली एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

मे 19, 2025
शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र एक कृषी व एक टीम 8 1024x682 1

शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र – एक कृषी व एक टीम…केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा

मे 19, 2025
IMG 20250518 WA0139 1024x683 1

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

मे 19, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, सोमवार, १९ मेचे राशिभविष्य

मे 19, 2025
bjp11

भाजप जिल्हाध्यक्षांच्या यादी वरून घमासान; नक्की असं काय घडलं?

मे 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011