नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंबड पोलीसांची नायलॉन मांजा विक्री करणा-या अटक करुन त्याच्याकडू तब्बल १५० नायलॉन मांजाचे गटटु जप्त केले. सनशाईन हॉटेलच्या मोकळया मैदानात हा व्यक्ती पांढ-या रंगाचे गोणीमधून नायलॉन मांजाची विक्री करत होता. या विक्रेत्यावर पोलिसांनी कारवाई करत ६० हजार रुपये किंमतीचा नायलॅन मांजा जप्त केला.
अंबड पोलीस ठाणे येथील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक नाईद शेख, पोलिस हवालदार किरण गायकवाड, राकेश पाटील, राठोड यांनी सापळा रचून अरबाज फिरोज शेख (२४) रा. घर नाईकवाडीपुरा, जुने नाशिक, भद्रकाली यास अटक केली.
पोलीस आयुक्तांनी २६ डिसेंबर ते २३ जानेवारीपर्यंत नायलॉन मांजा खरेदी-विक्री करणारे इसमांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.