गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ऊर्जा विभागाच्या तीनही कंपन्यांना रोडमॅप बाबत उपमुख्यमंत्र्यांनी दिले हे निर्देश…

by India Darpan
डिसेंबर 28, 2023 | 6:56 pm
in संमिश्र वार्ता
0
unnamed 2023 12 28T185414.134 e1703769950235

मुंबई, (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना राज्याच्या सर्वांगीण विकासात महत्वाचे क्षेत्र असणाऱ्या ऊर्जा विभागाची भूमिका मोलाची असणार आहे. त्यामुळे ऊर्जा विभागाच्या तीनही कंपन्यांनी ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत विकासाचा सन २०३५ पर्यंतचा एकत्रित रोडमॅप पुढील तीन महिन्यांत सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या सूत्रधारी कंपनीच्या तीनही संचालक मंडळाची बैठक आज झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. या बैठकीला प्रधान सचिव तथा महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी अनबलगन, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीवकुमार, स्वतंत्र संचालक विश्वास पाठक उपस्थित होते.

राज्यात औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढणार आहे हे सांगून श्री. फडणवीस म्हणाले, महाजेनकोने सर्व अंगाने ऊर्जा निर्मिती वाढविण्यासाठी अधिक वेगाने काम करणे आवश्यक आहे. कोराडी, पारस व इतर ठिकाणी ऊर्जा निर्मिती वाढविण्यासाठी व्यवहार्यता तपासावी. आपल्याला निरंतर आणि गुणवत्तापूर्ण वीज कशी देता येईल याचे नियोजन आणि अंमलबजावणी करणे महत्वाचे आहे. औद्योगिक क्षेत्रातील यंत्रे ही खूप महागडी व जास्त वीज घेणारी असतात. त्यामुळे त्यांना अखंडित वीज पुरवठा करणे आवश्यक ठरते. अन्यथा ही यंत्रे निकामी होतात.

त्याचबरोबर भूमिगत वितरण प्रणाली करण्यावर भर द्यावा. प्रथम २५ टक्के भूमिगत प्रणाली करुन त्याचा अभ्यास करावा. वितरण खर्च किती वाढतो, वीज गळती किती कमी होते याचा अभ्यास करुन त्याअनुषंगाने नियोजन करावे. जादा भार असणाऱ्या वितरण वाहिन्या कमी करण्यासाठी दीर्घकालीन आणि कालबद्ध योजना आखावी. त्याचबरोबर असुरक्षित विद्युत ढाचे दूर करण्यासाठी सीएसआर निधी वापरावा,जेणेकरून यामुळे होणारे मृत्यू कमी करता येतील, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेल्या चोरट्याला जालन्यातून केली अटक…नदीपात्रात रंगला थरार

Next Post

नायलॉन मांजा विक्री करणारा गजाआड…६० हजाराचे १५० गट्टु जप्त

Next Post
IMG 20231228 WA0297 2 e1703771443669

नायलॉन मांजा विक्री करणारा गजाआड…६० हजाराचे १५० गट्टु जप्त

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अपूर्ण कामे पूर्ण होतील, जाणून घ्या, गुरुवार, १९ जूनचे राशिभविष्य

जून 18, 2025
Untitled 53

मुक्त विद्यापीठ ठरले भारतातील पहिले माजी विद्यार्थ्यांची सर्वाधिक नोंदणी असलेले विद्यापीठ…इतकी आहे विद्यार्थीसंख्या

जून 18, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0320 1

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू…

जून 18, 2025
WhatsApp Image 2025 06 18 at 5.12.48 PM e1750253428522

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन…

जून 18, 2025
nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011