येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक येथून येवला येथे येत असताना मंत्री छगन भुजबळ यांना भरवस फाटा येथे मराठा कार्यकर्त्यानी काळे झेंडे दाखवत आंदोलन केले. त्यांचा ताफा रस्त्याने जात असताना हे काळे झेंडे दाखवण्यात आला. यावेळी भुजबळांचा निषेध नोंदवत भुजबळ गो बॅकच्या घोषणा देण्यात आल्या.
गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील व भुजबळ यांच्यात आरोप – प्रत्यारोप सुरु आहे. त्यातून भुजबळ यांना ठिकठिकाणी मराठा आंदोलकांच्या रोषाला सामना करावा लागत आहे. आज त्यांच्याच येवला विधानसभा मतदार संघात या विरोधाचे दुस-यांदा पडसाड उमटले.
२५ दिवसापूर्वी ते येवला विधानसभा मतदार संघात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळेसही अनेक ठिकाणी त्यांना रोषाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे ते अर्धवट दौरा सोडून शहापूरकडे रवाना झाले होते. यावेळेसही त्यांना हा रोषाचा सामना दुस-यांदा करावा लागत आहे.