बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकच्या खानदेश महोत्सव यांना मिळाले खानदेश रत्न पुरस्कार…रंगारंग कार्यक्रमांनी आणली फुल टू धमाल

by India Darpan
डिसेंबर 25, 2023 | 3:14 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20231225 WA0232 1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खानदेश महोत्सवात तिसऱ्या दिवशीच्या सायंकाळच्या सत्रात सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम महाराष्ट्राची हास्य जत्रा यातील सुप्रसिद्ध विनोदी अभिनेत्यांचे फुल टू धमाल सादरीकरण, लावणी क्वीन माधुरी पवारच्या दिलखेचक अदांनी सादर केलेल्या लावणी नृत्य आणि मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान केले गेलेले खानदेश रत्न पुरस्कार अशा रंगारंग कार्यक्रमांनी नाशिककरांची रविवारची सायंकाळ संस्मरणीय झाली.

नाशिक पश्चिम मतदार संघाच्या भाजपच्या आमदार सौ. सीमा महेश हिरे यांनी आयोजित केलेल्या पाचव्या खानदेश महोत्सवाचा रविवारी तिसरा दिवस होता. रविवारच्या गुलाबी थंडीतली सायंकाळ ठक्कर डोम येथे उत्तर महाराष्ट्र व नाशिक मधून आलेल्या रसिक प्रेक्षकांसाठी मनमुराद आनंद देणारी ठरली. सुरुवातीला कीर्ती कला मंदिरच्या विद्यार्थिनींनी नृत्याद्वारे गणेश वंदना सादर केली. त्यानंतर महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतील कलावंत श्याम राजपूत, प्रभाकर मोरे यांच्या विनोदी प्रहसनाने उपस्थित प्रेक्षकांना मनमुराद हसवले. माधुरी पवारच्या लावणी नृत्याने प्रेक्षकांना आपापल्या जागेवर थिरकायला भाग पाडले. मध्यंतरात विविध क्षेत्रातील नामवंतांना खानदेश रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात सुनील बागुल, अजित चव्हाण, सचिन होळकर , शाम बडोदे, संदीप भदाणे, अनिल चांदवडकर, डॉ. मयूर पाटील, श्यामसुंदर राजपूत, प्रा. सुमती पवार, स्नेहा कोकणे पाटील, हेमंत पगार, किरण सोनार, आकाश पगार यांचा समावेश होता.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार कार्यक्रमाच्या आयोजक आमदार सीमा हिरे,विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय महामंत्री दादा वेदक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, महेश हिरे, योगेश हिरे आदी मान्यवर अतिथींच्या हस्ते सदरचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. भारती पवार यांनी खानदेश महोत्सव हा नाशिककर आणि उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांसाठी निखळ मनोरंजन, ज्ञानार्जन, प्रदर्शन, व्यवसायाची , पर्यटनाची , कलागुणांच्या सादरीकरणाची संधी उपलब्ध करून देणारा तसेच भाषा, संस्कृती, जीवनपद्धती यांचा परिचय आणि आदानप्रदान यासाठी आमदार सौ. हिरे , महेश हिरे व रश्मी हिरे यांच्या अथक परिश्रमातून सातत्याने आयोजित केला जातो. एवढा मोठा इव्हेंट नाशिक मध्ये नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात एकमेव असावा असे गौरवोद्गारही डॉ. पवार यांनी यावेळी काढले.

पुरस्कार वितरणानंतर पुन्हा गौरव मोरे, शिवाली परब, रोहित माने आणि वनिता खरात यांच्या विनोदी सादरीकरणाने उपस्थितांना लोटपोट हसवले. माधुरी पवार यांच्या बहारदार नृत्याने या कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजिका रश्मी हिरे बेंडाळे व दीप्ती हलवाई यांनी केले. या कार्यक्रमासाठी कडाक्याच्या थंडीतही हजारो नाशिककरांनी हजेरी लावली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चीनी मांजाने घेतला पोलिसाचा बळी…ड्युटीवरुन घरी जात असतांना घडली घटना

Next Post

मंत्री भुजबळ यांना भरवस फाट्याजवळ मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे…गो बँकच्या घोषणाही दिल्या (बघा व्हिडिओ)

India Darpan

Next Post
Screenshot 20231225 150715 WhatsApp

मंत्री भुजबळ यांना भरवस फाट्याजवळ मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे…गो बँकच्या घोषणाही दिल्या (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011