इंडिाय दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईत चीनी मांजाने एका पोलिसाचा बळी घेतल्याची घटना समोर आली आहे. समीर सुरेश जाधव असे या हवालदाराचे नाव आहे. वाकोला परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. समीर जाधव वरळीतील बीडीडी चाळीत राहत होते. ड्युटी संपवून पोलिस दुचाकीवरून घरी जात असतांना ही घटना घडली.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, वाकोला पुलावर त्यांच्यासमोर अचानक पतंगाचा मांजा आला. त्या मांजाने त्यांचा गळा चिरला गेला. या घटनेत ते बाईकवरून खाली पडून गंभीर जखमी झाले. आजूबाजूच्या वाहनचालकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. खेरवाडी पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर जाधव यांना सायन रुग्णालयात उपरासाठी नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. ओळखपत्रावरून ते पोलिस दलात कार्यरत असल्याचे पोलिसांना समजले. जाधव यांच्या दुर्दैवी, अकस्मात मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
बंदी घालण्याच्या चीनी मांजामुळे दरवर्षी मृत्यूच्या घटना समोर येत असतात. त्यावर कारवाई केली जाते. पण, हा मांजा विकणे काही बंद होत नाही. त्याचा वापरही स-हास केला जातो. संक्रातीला अजून तीन आठवडे असताना पतंग उडवायला आतापासूनच सुरुवात झाली आहे. एका पतंगाने मुंबईत एका पोलिसाचा बळी घेतला आहे.