मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नुकत्याच झालेल्या तीन राज्यातील ओपिनियन पोल फेल ठरले असले तरी ओपिनिय पोलचे सर्व्हे काही थांबत नाही. आता नुकताच एबीपी- सी व्होटर्सने केलेला सर्व्हे समोर आला असून त्यात महायुतीची झोप उडावी अशी आकडेवारी समोर आली आहे. यात ४ टक्के जास्त मते महाविकास आघाडीला मिळाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीत ४८ जागा आहे. यात महायुतीत भाजप, शिंदे व अजित पवार गट एकत्रीत लढणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेस, ठाकरे व शरद पवार यांचा गट निवडणुकीत समोर असणार आहे. दोन्ही गटातच सामना रंगणार आहे. त्यामुळे सर्व्हेही महायुती व महाविकास आघाडी असाच केला गेलेला आहे.
या सर्व्हेमध्ये ४८ जागापैकी महाविकास आघाडीला २६ ते २८ जागा मिळेल व ४१ टक्के मते मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर
तर महायुतीला १९ ते २१ जागा मिळेल व मतांची टक्केवारी ३७ टक्के असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर इतर राजकीय पक्षांच्या पारड्यात २ जागा इतरांना २२ टक्के मते जाईल असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. याअगोदरही आलेल्या ओपिनियन पोलमध्ये महाविकास आघआडीची सरशी दाखवली होती. आताही तीच कायम आहे.