इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इंदूर महानगरपालिकेच्या वतीनं खरगोन जिल्ह्यातल्या सामराज आणि आशुखेडी या गावांमध्ये उभारल्या जाणाऱ्या ६० मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचं भूमिपूजनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे. या प्रकल्पांच्या उभारणीसाठी ३०८ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
या नव्या सौर ऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीमुळे इंदूर महानगरपालिकेला वीज बिलांमध्ये दरमहा सुमारे चार कोटी रुपयांची बचत करणं शक्य होणार आहे. सौर प्रकल्पाच्या उभारणीसाठीचा निधी उभारण्याकरता इंदूर महानगरपालिकेनं २४४ कोटी रुपयांचे हरीत रोखे जारी केले होते. अशा पद्धतीनं हरीत रोखे जारी करणारी ती देशातील पहिली नागरी स्वराज्य संस्थाही ठरली होती.
इंदूर महानगरपालिकेच्या हरीत रोख्यांना देशभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला, आणि २९ राज्यांमधल्या नागरिकांनी, रोखे जारी करतानाच्या मूळ मूल्याच्या तीप्पट म्हणजेच सुमारे ७२० कोटी रुपयांची गुंतवणूकही केली.