इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाराष्ट्रात लोकसभा जागा वाटपाचा तिढा कसा सोडवायचा यासाठी महाविकास आघाडीने अर्थात आताच्या इंडिया आघाडीने नऊ जणांची एक समिती स्थापन केली आहे. आता ही समिती जागा वाटपावर चर्चा करणार आहे. या समितीत ठाकरे गटाकडून – संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई हे तीन नेते असणार आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख तर काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, बसवराज पाटील, नसीम खान हे नेते असणार आहे. नऊ जणांची ही समिती आता जागा वाटपाचा तिढा सोडणार आहे.
लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यात येऊन ठेपल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. महाराष्ट्रात राजकारणात आता दोन आघाड्या असणार हे जवळपास स्पष्ट आहे. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडी यात सामना रंगणार आहे. महायुतीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. तर महायुतीत काँग्रेस असला तरी राज्यात त्याची ताकद आता कमी झाली आहे. त्यामुळे या महायुतीत कोणाचे वर्चस्व जास्त असते व कोणाला जास्त जागा मिळतात हे काही दिवसानंतर आता समोर येईल.
जागा वाटपसाठी समिती स्थापन केली असली तरी यापूर्वीच उध्दव ठाकरे गटाने मुंबईच्या सहा जागापैकी ४ जागेवर दावा केला आहे. त्यात काँग्रेस व राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा घ्यावी असे त्यांचे म्हणणे आहे. तर काँग्रेसने तीन जागा मागितल्या आहे. हा सर्व तिढा असल्यामुळे काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतीच उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर या समितीची नावे पुढे आली.