इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पत्नीने दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून पतीने तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील मालाड परिसरात घडली. हे पती पत्नी गोरेगाव ते मालाड रेल्वे स्थानकादरम्यान एका बेकायदा झोपडीत राहत होते. गुरूवारी सायंकाळी महिलेच्या पतीने दारू पिण्यासाठी तिच्याकडे पैशांची मागणी केली होती. मात्र पत्नीने पैसे न दिल्यामुळे त्याने पत्नीला बेदम मारहाण करत हत्या केली.
परवीन अन्सारी असे मृत महिलेचे नाव असून हत्या करणारा पती मोईनुद्दीन अन्सारी आहे. पत्नी मोलमजूरी करुन पैसे कमवत होती. तीच्या पैशावर पती दारु पित होता. या कारणाने दोघांमध्ये नेहमी भांडण होत असायचे. तेव्हा पती पत्नीला मारहाण करायचा. पण, गुरुवारी पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर पतीने तीची हत्याच केली.
या घटनेची माहिती मिळताच बोरिवली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पतीचा शोध सुरु केला. या शोधानंतर मोईनुद्दीन अन्सारी हा मालवण परिसरातून अटक केली. त्याचा मुंबईतून पळून जाण्याचा प्लॅन होता. पण, तो फेल ठरला.