वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
सोशल मीडियावर मागील काही दिवसांपासून ऋतिक रोशनच्या फायटर सिनेमांची चर्चा होताना दिसतेय .याचे कारण म्हणजे कलाकारांचे या सिनेमांमधील डॅशिंग लुक! त्यामुळे प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता पाहायला मिळतेय.
या चित्रपटात ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोण सोबत अनिल कपूर सुद्धा मुख्य भूमिकेत आहेत. ऋतिक आणि दीपिकाचे फर्स्ट लूक समोर आलेले आहेत आणि आता अनिल कपूरचा पण लुक समोर आलाय. अनिल कपूर फायटरच्या लुक मध्ये दिसून येत आहेत.
निर्मात्यांनी सोशल मीडियावर अनिल कपूरचा दमदार लुक शेयर केलाय आणि हा लूक चाहत्यांना पण खूप आवडलाय. फायटर या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. हा चित्रपट २५ जानेवारी २०२४ ला रिलीज होईल.