इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सोशल मीडियावर रील काढून अपलोड करण्याची अनेकांना सवय लागली आहे. अनेकदा रिल्स बनवतांना अपघातही होतात तर काही ठिकाणी गुन्हे दाखलही झाले आहेत. हे रिल काढण्याची तरुणाईची क्रेझ इतकी वाढली की ते कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी काय करेल हे सांगता येत नाही. फक्त तरुणाईच नाहीतर वयस्कर लोकही अधून मधून हे रिल काढत असतात व सोशल मीडियावर तो अपलोड करतात. त्यावेळेस त्यांची कधीकधी किव येते तर काही गंमतीदार असतात.
पण, छपरा जिल्हयातील एका तरुणींचा रेल्वे प्लॅटफॅार्मवरचा हा रिल मात्र अनेकांना मनस्ताप देणारा ठरला. ही तरुणी प्लॅटफॅार्मवर गाडी थांबण्याच्या आतच रेल्वेतून उतरते व थेट डान्स करतांना हा रिल आहे. हे रिल @GaurangBhardwa1 याने ट्विट केले असून त्यात त्याने म्हटले आहे की, पर कोई केस नही होती ? ये तो कही से मजेदार भी नहीं है :
ही तरुण या व्हिडिओमध्ये डान्स इतका फास्ट करते की इतर प्रवाशांना तीचा धक्का बसतो. त्यावेळेस त्यांच्या रिअॅक्शनही कळतात. त्यामुळे हा व्हिडिओ मजेरदार तर नाहीच, पण, धक्कादायक व त्रासदायक आहे.