वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
पठाण, जवानच्या यशानंतर आता शाहरुख खानच्या डंकीची सर्वांना उत्सुकता आहे. २१ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. काही दिवसापूर्वी ड्रॅाप १ नावाने टीजर रिलीज केला होता. त्यानंतर ड्रॅाप २ व डॅाप ३ ने दोन गाणे रिलीज करण्यात आले. आता ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
या अगोदर अभिनेता शाहरुख खानच्या आगामी डंकी या सिनेमाचं पहिले गाणे ‘लटपट गया’ हे होते. त्यानंतर दुसरं गाणं १ डिसेंबरला प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात निकले थे कभी हम घर से असे कडवे असून ते भाविनक असे आहे. या गाण्यात शाहरुख खान त्याच्या मित्रांसोबत दिसत आहे.या गाण्याच्या प्रदर्शनानंतर निर्मात्यांनी या गाण्याचे नाव डंकी ड्रॉप ३ असे ठेवले. आता ट्रेलर रिजील करुन यातील थोडक्यात स्टोरी सुद्दा सांगितली आहे. पण, चित्रपट बघितल्यानतंर संपूर्ण कथानक कळणार आहे.
या चित्रपटात शाहरुख खान व्यतिरिक्त अभिनेत्री तापसी पन्नू आणि अभिनेता विकी कौशल यांच्याही मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट राजकुमार हिराणी यांनी दिग्दर्शित केला असल्याने प्रेक्षकांच्या या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.