अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संगमनेर उपविभागातील संगमनेर व अकोले तालुक्यातील १५१ गावातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाकरीता प्रचलित शासन तरतुदीनुसार, प्रवर्गनिहाय आरक्षण निधीत करावयाची असुन त्याअंतर्गत समांतर आरक्षण सोडत काढणे करीता दिनांक ७ डिसेंबर, २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय इमारत सभागृह, नविन नगर रोड, संगमनेर ( प्रांत कार्यालय संगमनेर) या ठिकाणी सभेचे आयोजन केलेले आहे.
सर्व संबंधित गावांतील नागरीकांनी आरक्षण सोडतेवेळी उपस्थित रहावे. एखादया गावातील नागरीक आरक्षण सोडतेवेळी उपस्थित राहिले नसल्यास व्हिडीओ चित्रिकरणाद्वारे आरक्षणसोडत करण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, याबाबत सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी,असे उपविभागीय दंडाधिकारी संगमनेर भाग संगमनेर शैलेश हिंगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.