इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
प्रभासच्या ‘सालार ‘या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून प्रेक्षकांचा त्याला भरभरून प्रतिसाद मिळताना दिसून येतोय.
सालार चा हिंदी ट्रेलर २४ तासात रेकॉर्ड ब्रेकिंग यूट्यूब वर पहिल्या २४ तासात सर्वाधिक पाहिला जाणारा हिंदी चित्रपटाचा ट्रेलर बनला आहे.
याआधी शाहरुख खानच्या डंकी चित्रपटाच्या ट्रेलरने युट्युब वर सर्वाधिक रेकॉर्ड केले होते. त्याला ५९ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.
सालारच्या हिंदी ट्रेलरने अवघ्या २४ तासात डंकीच्या ट्रेलरला महिन्याभरात जितके व्ह्यूज मिळाले आहेत. त्यापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
सालारच्या ट्रेलरला पहिल्या २४ तासात सर्व भाषांमध्ये एकूण ११६ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. यावरून लोकांमध्ये सालार या चित्रपटाची प्रचंड क्रेझ दिसून येतेय.