Last updated on December 3rd, 2023 at 11:25 am
वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
अभिनेता शाहरुख खानच्या आगामी डंकी या सिनेमाचं दुसरं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. हे गाणं टी सिरीजने युट्युब वर प्रदर्शित केला आहे.
‘लटपट गया’ हे पहिले गाणं यापूर्वी प्रदर्शित झालं त्यानंतर दुसरं गाणं १ डिसेंबरला प्रदर्शित झालं आहे.
या गाण्यात निकले थे कभी हम घर से असे कडवे असून ते भाविनक असे आहे. या गाण्यात शाहरुख खान त्याच्या मित्रांसोबत दिसत आहे .या गाण्याच्या प्रदर्शनानंतर निर्मात्यांनी या गाण्याचे नाव डंकी ड्रॉप 3 असे ठेवले आहे.
या चित्रपटात शाहरुख खान व्यतिरिक्त अभिनेत्री तापसी पन्नू आणि अभिनेता विकी कौशल यांच्याही मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट राजकुमार हिराणी यांनी दिग्दर्शित केला असल्याने प्रेक्षकांच्या या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.