इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः राष्ट्रवादी काँग्रेसवर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी अजित पवार यांनी मोठी खेळी खेळली आहे. बंडानंतर पवार यांनी पक्षाचे पहिले अधिवेशन बोलवले आहे. येत्या ३० आणि एक तारखेला अजित पवार गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा मेळावा अधिवेशन व मेळावा दोन दिवसीय अधिवेशन आणि मेळावा ३० आणि १ तारखेला होणार आहे. राज्यातील सर्व आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकारी अधिवेशनाला उपस्थित राहणार आहे. अधिवेशनच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
या अधिवेशनाच्या माध्यमातून आपल्यामागे किती आमदार, खासदार, पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत, हे दाखवण्याचा अजित पवार गटांचा प्रयत्न आहे. शरद पवार एकीकडे न्यायालयीन लढाईत मग्न असताना दुसरीकडे अजित पवार यांनी मात्र संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे.