इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मकाऊ येथे कॅसिनो मध्ये जुगार खेळताना भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा कथित फोटो ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी सोशल मीडियावर व्हायरला केल्यानंतर त्यावर जोरदार प्रतिक्रिया सुरु झाल्या आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र भाजपने आदित्य ठाकरे यांचा एक फोटो व्हायरल करत या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हीस्की? असा प्रश्न केला आहे.
संजय राऊत यांनी फोटो ट्वीट करतांना म्हटले आहे की, ते म्हणे.. फॅमिल सह मकाऊला गेले आहेत..जाऊ द्या. त्यांची सोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का? ते म्हणे.. कधीच जुगार खेळले नाहीत.. मग ते नक्की काय करीत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का? जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल! झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय!महाराष्ट्र पेटलेला आहे…आणि हे महाशय मकाऊ येथे कासिनोत जुगार खेळत आहेत. फोटो zoom करुन पहा…ते तेच आहेत ना?पिक्चर अभी बाकी है…19 नोव्हेंबर मध्यरात्री मुक्काम पोस्ट: मकाऊ,veneshine. साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्ष दर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत ..खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना?
या ट्वीट नंतर महाराष्ट्र भाजपने सुध्दा आदित्य ठाकरे यांचा फोटो व्हायरल करत म्हटले आहे की, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी तेथील हा परिसर. असो, ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलिकडे जाऊ शकत नाही. आम्हाला फक्त एक सांगा संजुभाऊ आदित्यच्या या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हीस्की? आता हे दोन्ही फोटो खरे आहे का… ते खरे असेल तर बावनकुळे खरंच जुगार खेळत होते का …किंवा आदित्य ठाकरे यांच्या ग्लासमध्ये खरंच व्हिस्की आहे का ? हा प्रश्न मात्र कायम राहणार आहे.