व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Friday, December 1, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

या राज्यात ३७ पीएम श्री केंद्रीय विद्यालयांचे आणि २६ पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय सुरु

India Darpan by India Darpan
November 20, 2023 | 12:45 pm
in संमिश्र वार्ता
0

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते रविवारी ओडिशा मध्ये ३७ पीएम श्री केंद्रीय विद्यालये आणि २६ पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयांचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर, अधिकारी वर्ग, शिक्षण तज्ञ आणि विद्यार्थी उपस्थित होते.

वर्ष २०४७ पर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी, देशातील शिक्षण क्षेत्राने प्रगती करण्याची गरज आहे, असे प्रधान यावेळी म्हणाले. त्यासाठी, ग्रामीण क्षेत्रातील मुलांनाही एकविसाव्या शतकातील शिक्षण देऊन, भविष्यासाठी तयार करावे लागेल, असेही ते म्हणाले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करताना प्रधान म्हणाले की, केवळ एक विषय म्हणून नव्हे तर मातृभाषेत इतर विषयही शिकवण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. जेव्हा मुले सुरुवातीच्या टप्प्यात त्यांच्या बोलीभाषेत शिक्षण घेतात, वाचतात आणि ऐकतात, तेव्हा त्यांची संशोधन, तर्क आणि विश्लेषण करण्याची क्षमता वाढते, असे ते म्हणाले.

पीएम श्री शाळा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करतील आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्ग तयार करणाऱ्या आदर्श शाळा म्हणून उदयास येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या शाळांमधून २१ व्या शतकातील प्रमुख कौशल्यांनी सुसज्ज सर्वसमावेशक आणि सर्वांगीण व्यक्ती तयार होतील, असे प्रधान म्हणाले.


Previous Post

ऑस्ट्रलियाचा विजयाचा उन्माद…मिशेल मार्श चक्क विश्वचषकावर पाय ठेऊन बसला..आता होत आहे जोरदार टीका

Next Post

दुर्दैवी…विजेचा करंट लागल्याने एकाच कुटुंबातील ४ लहान मुलांचा मृत्यू

Next Post
प्रातिनिधीक फोटो

दुर्दैवी…विजेचा करंट लागल्याने एकाच कुटुंबातील ४ लहान मुलांचा मृत्यू

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींसाठी चांगला दिवस, आर्थिक लाभ..जाणून घ्या..शनिवार २ डिसेंबरचे राशिभविष्य

December 1, 2023

अजितदादांना दिला इतक्या किलोचा गुलाब पुष्प……थेट इंटर नॅशनल बुकमध्येच झाली नोंद..बघा नेमकं काय घडलं

December 1, 2023

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाची मदत केव्हा मिळणार ? मुख्यमंत्र्यांनी दिली ही माहिती

December 1, 2023

घरातल्या गोष्टी बाहेर सांगणे चांगल्या मुलाचे लक्षण नाही.. जयंत पाटील यांनी अजित पवारांचे नाव न घेता केली ही टीका

December 1, 2023

दिंडोरीत राष्ट्रवादीचा जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर रॅली काढत शेतकरी आक्रोश मोर्चा

December 1, 2023

ग्रामपंचायत निवडणुकांचा खर्च पारंपरिक पद्धतीने सादर करता येणार.. ही आहे मुदत

December 1, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.