इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय संघाने विश्वचषकात सलग विजय मिळवल्यामुळे सर्वांच्या आशा उंचावल्या होत्या. पण, अंतिम सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला. त्यामुळे भारतीय प्रेक्षकांची निराशा झाली. तरी विश्वचषकात केलेल्या एकुणच कामगिरी बद्दल भारतीय प्रेक्षक खुश होते. पण, दुसरीकडे ऑस्ट्रलियाने चषक जिंकल्यानंतर त्यांचा विजयाचा उन्माद समोर आला आहे. ऑस्ट्रलियाचा मिशेल मार्श हा ड्रेसिंग रुममधये चक्क विश्वचषकावर पाय ठेऊन बसल्याचा फोटो सर्वत्र व्हायरल झाला असून त्यावरुन चांगलीच टीका होत आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने त्याच्या इन्स्टग्रामवर हा फोटो व्हायरल केला. त्यानंतर भारतीय प्रेक्षकांनी या फोटोवरुन सोशल मीडियावर चांगलीच टीका केली आहे. रविवारी झालेल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर भारतीय संघाच्या कप्तानालाही आपले अश्रू रोखता आले नाही. रोहित शर्माने आपले अश्रू मैदानात रोखले पण, तो धावत धावत ड्रेसिंग रुममध्ये गेला. त्यानंतर त्याने खेळाडूवृत्ती दाखवली. भारतीयांना सुध्दा या विजयानंतर कोणताही विरोध केला नाही. निराशा झाली अ्सली तरी ते भारतीय संघावर नाराज झाले नाही.
पण, दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघाने हा उन्माद दाखवल्यामुळे भारतीय प्रेक्षक चांगलेच भडकले आहे. भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांना मात्र हा पराभव जिव्हारी लागला असला तरी भारतीय संघाची विश्वचषकात असलेली कामगिरीमुळे ते खुशही होते. या विश्वचषकात विराट कोहली ७६५ धावा करून या स्पर्धेत आघाडीवर राहिला. त्यानंतर रोहित शर्माने ५९७ धावा केल्या. पण पूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली शेवट मात्र हवा तसा राहिला नाही तरी भारतीय क्रिकेट संघाने केलेल्या कामगिरीचे मात्र कौतुकच झाले…
नाणेफेकीचा कौल व पराभव
खरं तर अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय प्रेक्षकांच्या मनात कुठेतरी भीती होतीच. ती या सामन्यात खरी ठरली. या सामन्यात भारताला २४० धावांवर रोखण्यात ऑस्ट्रेलियाने रोखले व हे आव्हान ४३ षटकात ४ गडी गमवून पूर्ण केले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्डकप जेतेपदावर मिळवले. ऑस्ट्रेलियाने खरं तर या विश्वचषकामध्ये दोन सामने गमावले होते. पण, अंतिम सामन्यात त्यांनी सर्व सामने जिंकणा-या भारतीय संघाला पराभूत केले.
https://twitter.com/HitanshiKatari2/status/1726488794667618377