नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील कालिदास कला मंदिरमध्ये प्रसिध्द हिंदी कवी कुमार विश्वास यांच्या कार्यक्रमात मराठी भाषिक प्रेक्षकांना प्रवेश नाकारण्यात आल्यामुळे मोठा गोंधळ झाला. या कार्यक्रमाचे आयोजन हिंदी प्रसारणी सभेतर्फे करण्यात आले होते. त्यात त्यांनी हिंदी भाषिकांना या कार्यक्रमाचे पासेस दिल्यामुळे हा गोंधळ झाला. दोन तासाहून अधिक काळ उलटला तरी हा कार्यक्रम या गोंधळामुळे सुरु झाला नाही. अखेर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.
या कार्यक्रमाला मराठी भाषिक प्रेक्षकांना प्रवेश नाकारल्यामुळे त्यांनी हा कार्यक्रम बंद पाडला. या कार्यक्रमासाठी कोणतंही तिकट नव्हते हा कार्यक्रम मोफत होता. मराठी भाषिक प्रेक्षकांनी गोंधळ घातल्यामुळे कार्यक्रम स्थळी पोलिसही आले. त्यानंतर मराठी प्रेक्षकांनी जोपर्यंत प्रवेश मिळणार नाही तोपर्यंत कार्यक्रम सुरु करु देणार नाही असा पवित्रा घेतला. या कार्यक्रमासाठी प्रेक्षकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. पण या कार्यक्रमाचे पासेस केवळ हिंदी भाषिकांना वाटण्यात आल्यामुळे हा गोंधळ झाला. तब्बल नियोजीत वेळेपेक्षा हा कार्यक्रम दोन तास सुरु झाला नव्हता. नंतर तो रद्दच झाला.
Marathi-speaking audience denied entry to Kumar Vishwas’ program in Nashik, chaos