रविवार, ऑक्टोबर 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भारताचा न्यूझीलंडवर ६५ धावांनी विजय; सूर्यकुमारची शानदार शतकी खेळी

नोव्हेंबर 20, 2022 | 6:14 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Fh pd4dWAAIktBN

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना भारताने ६५ धावांनी जिंकला आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे होऊ शकला नव्हता. त्या सामन्यात नाणेफेकही होऊ शकली नाही. अशा स्थितीत हा सामना जिंकून भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सूर्यकुमारच्या शतकी खेळीमुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडसमोर १९२ धावांचे लक्ष्य ठेवले. त्याचवेळी न्यूझीलंडसाठी टीम साऊदीने हॅट्ट्रिक घेतली. प्रत्युत्तरात किवी संघ १८.५ षटकांत केवळ १२६ धावाच करू शकला आणि ६५ धावांनी सामना गमावला. या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने सहा गडी गमावून १९१ धावा केल्या. भारताकडून सूर्यकुमार यादवने नाबाद १११ धावांची खेळी केली. ईशान किशनने ३६ धावा केल्या आणि हार्दिक-श्रेयसने १३-१३ धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने तीन आणि लोकी फर्ग्युसनने दोन विकेट घेतल्या.

१९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. डावाच्या दुसऱ्या चेंडूवरच पहिली विकेट पडली. फिन ऍलन खाते न उघडताच बाद झाला. यानंतर कॉनवे आणि विल्यमसन यांनी ५६ धावांची भागीदारी केली, मात्र सुंदरने कॉनवेला बाद करून किवीजवर दबाव आणला. पुढच्याच षटकात चहलने ग्लेन फिलिप्सला बाद केले आणि सामन्यावरील भारताची पकड घट्ट झाली. यानंतर, किवीज नियमित अंतराने विकेट गमावत राहिले आणि अखेरीस १८.५ षटकांत १२६ धावांत गुंडाळले. कर्णधार विल्यमसनने सर्वाधिक ६१ आणि कॉनवेने २५ धावा केल्या. या दोघांशिवाय ग्लेन फिलिप्स (१२ धावा) आणि डॅरिल मिशेल (१० धावा) यांनाच दहाचा आकडा गाठता आला.

भारताकडून दीपक हुडाने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी दोन बळी घेतले. भुवनेश्वर कुमार आणि सुंदरला प्रत्येकी एक विकेट मिळाली. अर्शदीप हा एकमेव भारतीय गोलंदाज होता ज्याला एकही विकेट मिळाली नाही. या सामन्यात सूर्यकुमार यादवने शतक झळकावले. हे त्याचे भारतासाठी टी-२० क्रिकेटमधील दुसरे शतक ठरले. या वर्षी त्याने इंग्लंडविरुद्ध पहिले शतकही झळकावले. रोहित शर्मानंतर एका वर्षात दोन शतके करणारा तो दुसरा भारतीय ठरला आहे. त्याचबरोबर या सामन्यात हॅट्ट्रिक घेणारा टीम साऊथी टी-२० मध्ये दोन हॅट्ट्रिक घेणारा जगातील दुसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी त्याने पाकिस्तानविरुद्ध हॅट्ट्रिक घेतली होती. टी२० मध्ये दोन हॅट्ट्रिक घेणारा लसिथ मलिंगा हा पहिला गोलंदाज आहे.

https://twitter.com/ICC/status/1594277766496673794?s=20&t=NmvgukZ2ZT6ch50sQvIZIA

India vs New Zealand T20 Match Suryakumar Centaury

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची ५ वेळा मागितली होती’, भाजप प्रवक्ता बरळला

Next Post

मुकेश अंबानी झाले आजोबा; इशाने दिला जुळ्या बाळांना जन्म

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

IMG 20251018 WA0011
महत्त्वाच्या बातम्या

कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी चिंचोंडी औद्योगिक वसाहतीत प्रकल्प…

ऑक्टोबर 18, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा दिवस… जाणून घ्या, १९ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 18, 2025
IMG 20251018 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकच्या सामन्यात… महाराष्ट्राचा सौराष्ट्र वर १० गडी राखून दणदणीत विजय…

ऑक्टोबर 18, 2025
tejas
महत्त्वाच्या बातम्या

शत्रूला धडकी भरवणारे असे आहे तेजस लढाऊ विमान… मेक इन इंडियाचा बोलबाला…

ऑक्टोबर 17, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर घरबसल्या खरेदी करा सोने आणि मिळवा १० लाखांपर्यंतचे बक्षिस….

ऑक्टोबर 17, 2025
NMC Nashik 1
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरातील २८ ठिकाणची एकत्रित पार्किंग निविदा वादात…

ऑक्टोबर 17, 2025
organ donation
महत्त्वाच्या बातम्या

भावनिक क्षण… आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण…

ऑक्टोबर 17, 2025
IMG 20251017 WA0049
मुख्य बातमी

ओझर येथील कार्यक्रमात ‘तेजस’ लढाऊ विमानासह प्रशिक्षणार्थी विमान राष्ट्राला समर्पित…

ऑक्टोबर 17, 2025
Next Post
Isha ambani and anand

मुकेश अंबानी झाले आजोबा; इशाने दिला जुळ्या बाळांना जन्म

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011