इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन T20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाने पहिला टी-२० सामना २१ धावांनी गमावला, पण दुसरा सामना सहा विकेटने जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकांत आठ गडी गमावून 99 धावा केल्या. भारताने 100 धावांचे लक्ष्य एका चेंडू राखून पूर्ण केले. भारताचा हा निसटता विजय ठरला.
लखनौच्या एकना स्टेडियमवर न्यूझीलंडने भारतासमोर 100 धावांचे लक्ष्य ठेवले. किवी संघाने 20 षटकांत आठ गडी गमावून 99 धावा केल्या. ही न्यूझीलंडची भारताविरुद्धची टी-20 मधील सर्वात कमी धावसंख्या आहे. भारतीय फिरकीपटूंसमोर न्यूझीलंडचे फलंदाज हतबल दिसत होते. फिरकीपटूंनी एकूण चार विकेट घेतल्या. फिरकीपटू युजवेंद्र चहलनेही भारतासाठी विकेटचे खाते उघडले. त्याने फिन ऍलनला क्लीन बोल्ड केले. अॅलनला 11 धावा करता आल्या.
https://twitter.com/BCCI/status/1619743994724102146?s=20&t=2jvrvXZtJYe_GXnW38N8Dg
यानंतर वॉशिंग्टन सुंदरने डेव्हॉन कॉनवेला इशान किशनकरवी झेलबाद केले. त्याला 11 धावाही करता आल्या. अर्धवेळ फिरकी गोलंदाज दीपक हुडाने ग्लेन फिलिप्सला (5) बाद करत न्यूझीलंडला तिसरा धक्का दिला. यानंतर कुलदीप यादवने डॅरिल मिशेलला क्लीन बोल्ड केले. मिशेल आठ धावा करू शकला.
https://twitter.com/BCCI/status/1619706576587350019?s=20&t=2jvrvXZtJYe_GXnW38N8Dg
मार्क चॅपमनला कुलदीपने धावबाद केले. त्याला 21 चेंडूत 14 धावा करता आल्या. त्याचवेळी मायकेल ब्रेसवेलला कर्णधार हार्दिक पांड्याने अर्शदीप सिंगच्या हाती झेलबाद केले. त्याला 14 धावा करता आल्या. यानंतर 18व्या षटकात अर्शदीपने एका षटकात दोन बळी घेतले. त्याने ईश सोधीला हार्दिककडे झेलबाद केले. त्यानंतर फर्ग्युसनला सुंदरने झेलबाद केले. सोधीला एकही धाव आणि फर्ग्युसन खातेही उघडता आले नाही. कर्णधार मिचेल सँटनर १९ धावांवर नाबाद राहिला आणि जेकब डफीने सहा धावा केल्या. भारताकडून अर्शदीपने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर चहल, कुलदीप, हुडा, सुंदर आणि हार्दिक यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
https://twitter.com/BCCI/status/1619716971007995904?s=20&t=2jvrvXZtJYe_GXnW38N8Dg
India vs New Zealand 2nd T20 Match India Win