इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीचा सामना आज सुरू झाला. इंदूर कसोटीतील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात चार गड्यांच्या मोबदल्यात 156 धावा केल्या आहेत. भारताने पहिल्या डावात 109 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियन संघाने आतापर्यंत 47 धावांची आघाडी घेतली आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव लवकरात लवकर संपवण्याचा भारताचा प्रयत्न असेल. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया संघाला पहिल्या डावातच मोठी आघाडी घेत सामन्यातील आपली पकड मजबूत करायची आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित आणि गिल जोडीने पहिल्या विकेटसाठी 27 धावांची भागीदारी केली. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात कर्णधार रोहित 12 धावांवर यष्टिचित झाला. यानंतर भारतीय संघ गडगडला. गिल 21, पुजारा १ आणि कोहली 22 धावा करून बाद झाला. श्रेयसला खातेही उघडता आले नाही. भरतच्या 17 आणि अक्षरच्या 12 धावांनी भारताची स्थिती थोडी सुधारली. अश्विन ३ धावा करून बाद झाला आणि उमेशने 17 धावांची खेळी खेळून भारताची धावसंख्या 100 धावांच्या पुढे नेली. सिराज खाते न उघडताच धावबाद झाला आणि भारताचा डाव 109 धावांवर आटोपला.
https://twitter.com/BCCI/status/1630875324081901569?s=20
प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट 12 धावांवर पडली. ट्रॅव्हिस हेडला विकेट्ससमोर पायचीत करून रवींद्र जडेजाने भारताला पहिले यश मिळवून दिले. मात्र, यानंतर ख्वाजा आणि लबुशेन यांनी ९६ धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला सामन्यात खूप पुढे नेले. लबुशेन 31 आणि ख्वाजा 60 धावा करून बाद झाला. कर्णधार स्मिथने 26 धावा केल्या. पीटर हँड्सकॉम्ब सात आणि कॅमेरॉन ग्रीन सहा धावा करून क्रीजवर आहेत. पहिल्या डावाच्या आधारे ऑस्ट्रेलियाला 47 धावांची आघाडी मिळाली आहे. भारताकडून रवींद्र जडेजाने चारही विकेट घेतल्या आहेत.
https://twitter.com/BCCI/status/1630839190660284416?s=20
आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. टीम इंडियाने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत आधीच 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. ही कसोटी जिंकून भारतीय संघाला मालिका जिंकायची आहे. तसेच, हा सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल.
https://twitter.com/BCCI/status/1630891659201331202?s=20
India Vs Australia 3rd Test Match 1st Day