पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पैशाची योग्य गुंतवणूक हे एक मोठे आव्हान असते. टपाल खात्याच्या अल्पबचत योजनेत गुंतवणुकीचा उत्तम पर्याय तुम्ही निवडू शकता. तुम्हाला चांगला परतावाही मिळतो, या योजनेत गुंतवलेला पैसाही पूर्णपणे सुरक्षित असतो. त्यामुळे ग्राहकांचा याकडे कल वाढत आहे.
पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही योजनेतून गुंतवणूकदारांना फायदा होतो. त्यात महिनावार गुंतवणूक योजना लोकप्रिय आहे. या योजनेत दर महिन्याला कमाईची संधी मिळते. या योजनेत एकरक्कमी ९ लाख रुपये गुंतवल्यास, दर महिन्याला ५ हजार रुपये मिळवता येईल. तसेच ५ वर्षानंतर पूर्ण रक्कमही काढता येईल. MIS योजनेत सिंगल आणि ज्वाईंट खाते उघडता येते. सध्या अनेक गुंतवणूकदार रिटायरमेंटनंतर या योजनेत रक्कम गुंतवतात आणि फायदा मिळवत आहेत. पोस्ट खात्याची योजना असल्याने त्यात रक्कम बुडण्याचा कुठलाही धोका नाही.
पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीममध्ये एकल खातेदार जास्तीत जास्त ४.५ लाख रुपये गुंतवू शकतो. तर संयुक्त खात्यात जास्तीत जास्त ९ लाख रुपये गुंतवणूक करता येते. संयुक्त खात्यात दोघांपेक्षा तिघांचाही सहभाग असू शकतो. परंतु, जास्तीत जास्त ९ लाख रुपये जमा करता येतात. विशेष म्हणजे पोस्ट ऑफिसच्या मंथली इनकम स्कीमवर सध्या ६.६ टक्के वार्षिक परतावा मिळत आहे. योजनेत ९ लाख रुपये जमा केले तर ६.६ टक्के वार्षिक व्याजदराने एका वर्षात एकूण ५९,४०० रुपये जमा होतील. म्हणजेच तुम्हाला मासिक
४९५० रुपये मिळतील. तर एकल खातेधारकाला ४ लाख ५० हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर २४७५ रुपये दर महिन्याला व्याज मिळेल.
मात्र या योजनेत सहभागी होण्यासाठी पोस्ट खात्यात बचत खाते असणे अनिवार्य आहे. खात्याचे केवायसी पूर्ण करण्यासाठी तुमच्याकेड आधार कार्ड, पासपोर्ट अथवा मतदान कार्ड, वाहन परवाना आवश्यक आहे. २ पासपोर्ट साईज फोटो, पत्त्यासाठी वीज बिल अथवा इतर बिलाची प्रत आवश्यक आहे. त्यानंतर टपाल कार्यालयात जाऊन ‘पीओएमआयएस ‘ शी संबंधित अर्ज भरावा लागेल. त्याचप्रमाणे हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करावा लागेल. अर्ज भरतानाच वारसाचे नाव द्यावे लागेल . खाते उघडण्यासाठी १ हजार रुपयांची रोख अथवा धनादेश द्यावा लागेल. त्यानंतर एकरक्कमी पैसा गुंतवावा लागेल. परंतु त्याचा फायदा गुंतवणूकदारांना तथा ग्राहकांना चांगला मिळतो असे दिसून येते.
India Post Scheme Investment Monthly Investment Scheme Return Money
MIS