इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तुमचे जर पोस्टामध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे वृत्त आहे. कारण, तुम्हाला एक काम तातडीने करावे लागणार आहे. अन्यथा तुचे खाते बंद होऊ शकते. तुमच्या बँक खात्याला तुमचा मोबाईल क्रमांक जोडलेला आहे की नाही हे तातडीने तपासा. जर नसेल तर येत्या ३१ मार्च पर्यंत तुम्हाला संधी आहे. त्यानंतर खाते बंद होणार आहे.
सद्यस्थितीत पोस्टाकडून विशेष मोहिम राबविली जात आहे. त्याअंतर्गत पोस्ट खात्याशी मोबाईल क्रमांक जोडण्याचे काम सुरू आहे. मात्र, खातेदारांकडून या मोहिमेकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा पुरावा म्हणजे मोबाईल लिंक खात्यांची संख्या. मोहीम सुरू होऊन सुमारे दीड महिना उलटून गेला आहे, परंतु बऱ्याच पोस्ट ऑफिसमधील ६० ते ७० टक्के खातेधारकांनी त्यांचे मोबाइल नंबर त्यांच्या खात्यांशी लिंक केलेले नाहीत.
यापैकी बहुतांश खाती अशी आहेत की ग्राहकांना नियमितपणे पोस्ट ऑफिसला जाण्याची गरज नाही. जसे- RD, FD, सुकन्या समृद्धी, EPF, किसान विकास पत्र, राष्ट्रीय बचत पत्र, ज्येष्ठ नागरिक खाते. या संदर्भात बचत खात्यांची आकडेवारी काही प्रमाणात समाधानकारक आहे. खातेधारकांचे मोबाईल क्रमांक ७० टक्के बचत खात्यांशी जोडले गेले आहेत. म्हणजेच या खात्याच्या ३० टक्के खातेदारांनीही या मोहिमेकडे आतापर्यंत लक्ष दिलेले नाही.
म्हणून गरजेचे
ग्राहकांच्या अनियमितपणामुळे या खात्यांमध्ये हेराफेरी होण्याची शक्यता कायम आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी खात्याशी मोबाईल क्रमांक जोडलेला असणे आवश्यक आहे. कारण, खात्यातून पैसे काढले किंवा जमा केले तरी त्याची माहिती खातेदाराला मोबाईलवर मेसेजद्वारे तत्काळ कळविली जाते. पोस्ट विभागाने काही काळापासून आपल्या खातेदारांना एनईएफटी आणि आरटीजीएस सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. ही सुविधा देण्यासाठी मोबाईल क्रमांकही आवश्यक आहे. NEFT आणि RTGS दरम्यान खातेधारकाच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येतो. अशा परिस्थितीत खातेदारांना मोबाईल क्रमांक नसल्यामुळे या सुविधेचा लाभ घेता येणार नाही.
यासंदर्भात पोस्ट विभागाने सांगितले आहे की, खातेधारक मोबाईल क्रमांक खात्याशी जोडण्याबाबत गंभीर नाहीत. अजूनही ६० ते ७० टक्के खात्यांमध्ये मोबाईल नंबर जोडला गेलेला नाही. ३१ मार्चपर्यंत ज्या खात्यांशी मोबाईल नंबर लिंक नाहीत ते खाते १ एप्रिलपासून बंद केले जातील. त्याची संपूर्ण जबाबदारी खातेदाराची असेल, असा इशारा पोस्ट विभागाने दिला आहे.
India Post Account Do This Immediately otherwise Account Will Be closed