स्वयंपाकघरातील वनस्पती
आयुर्वेदाचे ब्रीद आहे
स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं
व्याधीतस्य व्याधी परिमोक्ष:
म्हणजे आधी निरोगी व्यक्तीच्या आरोग्याचे रक्षण करा आणि तरीही व्याधी झालेच तर त्याचे निराकरण करा. म्हणजे प्रथम भर निरोगी कसे राहावे यावर. म्हणून या लेखमालेत आपण निरोगी राहण्यासाठी काय करावे याची माहिती घेणार आहोत. आपल्या संस्कृतीचा आयुर्वेद हा अविभाज्य भाग आहे. आपल्या रोजच्या आहारात असलेल्या वनस्पती त्याची साक्ष देतात. हळद, मोहरी, जिरे, धने, खोबरे ई. तर सर्वप्रथम आपण आपल्या स्वयंपाकघरातील वनस्पतींविषयी माहिती करून घेऊ या..
आपल्या भारतात आसेतू हिमाचल स्वयंपाक घरात विविध वनस्पतींची रेलचेल असते. स्वयंपाक बनवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत,पण त्यात वापरायचे सर्वसाधारण घटक तेच असतात ,उदा. जिरे, मोहरी, खोबरे, तिखट, हळद वगैरे. त्यांचा सूक्ष्म विचार केला तर त्यावर असणारा आयुर्वेदाचा प्रभाव आपल्याला स्पष्ट जाणवेल. त्या सर्व घटकांची शास्त्रीय माहिती या सदरातून आपण करून घेऊ या.
आयुर्वेदाचार्य डॉ. निलिमा राजगुरू यांच्याविषयी..
ही लेखमाला लिहिणार आहेत आयुर्वेदाचार्य डॉ. निलिमा राजगुरू. त्या नाशिक मधील ज्येष्ठ आयुर्वेद चिकित्सक आहेत. गेली 25 वर्षे नाशिक मध्ये आयुर्वेद तज्ञ व पंचकर्म आणि गर्भसंस्कार तज्ञ म्हणून सेवा देत आहेत. आण्णा शास्त्री दातार यांच्या त्या शिष्या आहेत. आदरणीय आण्णांकडून शास्त्रोक्त आयुर्वेदीय औषधी करण व आयुर्वेद उपचार याविषयी सखोल मार्गदर्शन त्यांनी घेतले आहे. आयुर्वेद औषधी उत्पादनाचा 10 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे.
वनवासी कल्याण आश्रम, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, आयुर्वेद व्यासपीठ या संस्थांच्या विविध समाज उपयोगी कार्यक्रमात सहभाग असतो. निराधार स्वावलंबन समिती या झोपडपट्टीतील मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या संस्थेच्या त्या संचालिका आहेत. आयुर्वेद, पंचकर्म, गर्भसंस्कार, कळी उमलताना, स्त्रियांचे आरोग्य या विषयावर अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्याने दिली आहेत. वर्तमानपत्रे, मासिके यामधून विविध विषयांवर ते सातत्याने लेखन करीत असतात. 2017 व 2019 मध्ये फ्रान्स मध्ये आयुर्वेद या विषयावर विविध ठिकाणी व्याख्याने त्यांनी दिली आहेत. आयुष मान्यताप्राप्त इंटर नॅशनल योग शिक्षिका सुद्धा त्या आहेत. १. शास्त्रोक्त गर्भसंस्कार २. आयुर्वेद आणि पंचकर्म शास्त्रीय परिचय या दोन पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
डॉ.नीलिमा हेमंत राजगुरु
संचालिका, आयु स्पा आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र
कॉलेजरोड, नाशिक
मो. 9422761801.
ई मेल – drneelimarajguru@gmail.com
India Darpan New Article Series Kitchen Plants by Dr Neelima Rajguru