India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

टीम इंडिया गडगडली… केवळ पुजारानेच राखली लाज… ऑस्ट्रेलियासमोर अवघ्या ७६ धावांचे लक्ष्य… भारत पराभवाच्या छायेत

India Darpan by India Darpan
March 2, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारत आता पराभवाच्या छायेत आहे.  भारताने ऑस्ट्रेलियासमोर 76 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. टीम इंडियाचा दुसरा डाव 163 धावांवर आटोपला. भारताने पहिल्या डावात 109 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १९७ धावा केल्या होत्या. कांगारूंना 88 धावांची आघाडी मिळाली होती. भारताने दुसऱ्या डावात 163 धावा केल्या. त्यामुळे 75 धावांची आघाडी घेतली. आणि आता त्यांच्यासमोर 76 धावांचे लक्ष्य ठेवले. भारताची अखेरची विकेट मोहम्मद सिराजच्या रूपाने पडली. यासह पंचांनी दुसऱ्या दिवसाचा खेळही संपल्याची घोषणा केली. आता ऑस्ट्रेलियाला पुढील तीन दिवसांत ७६ धावा करायच्या आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनने दुसऱ्या डावात 64 धावांत आठ गडी बाद केले. त्याची कसोटी कारकिर्दीतील ही दुसरी सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे. यापूर्वी 2017 मध्ये लियॉनने बेंगळुरूमध्ये 50 धावांत आठ विकेट घेतल्या होत्या. दुसऱ्या डावात भारताची सुरुवात खराब झाली. शुभमन गिल पाच धावा करून लिऑनने क्लीन बोल्ड झाला. कर्णधार रोहित शर्मा 12 धावा करून लिऑनच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू झाला.

Shreyas Iyer on the charge. Goes for a maximum off Matthew Kuhnemann.#TeamIndia with a lead of 23 runs now.

Live – https://t.co/xymbrIdO60 #INDvAUS @mastercardindia pic.twitter.com/jlHiAFmCdv

— BCCI (@BCCI) March 2, 2023

यानंतर विराट कोहलीही काही खास करू शकला नाही आणि मॅथ्यू कुहनेमनच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट झाला. रवींद्र जडेजा सात धावा करून लिऑनचा बळी ठरला. यानंतर श्रेयस अय्यरसह चेतेश्वर पुजाराने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. श्रेयसनेही 27 चेंडूत 26 धावा केल्या, पण स्टार्कच्या चेंडूवर ख्वाजाकडे झेल देऊन त्याची विकेट गमावली.

श्रेयसने पुजारासोबत 35 धावांची भागीदारी केली. नॅथन लायनने श्रीकर भरतला क्लीन बोल्ड करून भारताला सहावा धक्का दिला. भरतला तीन धावा करता आल्या. दरम्यान, पुजाराने कसोटी कारकिर्दीतील 35 वे अर्धशतक झळकावले. ऑस्ट्रेलियाविरुद्धचे हे त्याचे 16 वे अर्धशतक होते. अश्विनला बाद करून लियॉनने 23व्यांदा डावात पाच बळी घेतले. यानंतर लिओननेही पुजाराला स्टीव्ह स्मिथकरवी झेलबाद केले.

ICYMI – 𝟭𝟬𝟬𝘁𝗵 𝗧𝗲𝘀𝘁 𝘄𝗶𝗰𝗸𝗲𝘁 in India for @y_umesh 💪

What a ball that was from Umesh Yadav as he cleans up Mitchell Starc to grab his 100th Test wicket at home. #INDvAUS pic.twitter.com/AD0NIUbkGB

— BCCI (@BCCI) March 2, 2023

पुजारा 142 चेंडूत 59 धावांची लढाऊ खेळी करून बाद झाला. आपल्या खेळीत त्याने पाच चौकार आणि एक षटकार लगावला. लिओनने उमेशला ग्रीनच्या हाती झेलबाद केले आणि शेवटी सिराजला क्लीन बोल्ड केले आणि डावात आठ विकेट्स घेतल्या. लियॉनशिवाय मिचेल स्टार्क आणि कुहनेमन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

Stumps on Day 2⃣ of the third #INDvAUS Test.@cheteshwar1 top-scores for #TeamIndia 🇮🇳 with a magnificent 59 (142) 👏🏻👏🏻

We will be back with Day three action tomorrow as Australia need 76 runs in the final innings.

Scorecard – https://t.co/t0IGbs2qyj @mastercardindia pic.twitter.com/m0xdph0GeA

— BCCI (@BCCI) March 2, 2023

India Australia Cricket 3rd Test Match


Previous Post

‘आवाज खाली करा किंवा माझ्या कोर्टातून बाहेर जा’, सरन्यायाधीश कुणावर चिडले?

Next Post

उद्योगमंत्र्यांचा सावळागोंधळ! आधी जाहीर केले नाशकात होणार १० कोटींचा प्रकल्प… आता म्हणाले, पुण्यात होणार…

Next Post

उद्योगमंत्र्यांचा सावळागोंधळ! आधी जाहीर केले नाशकात होणार १० कोटींचा प्रकल्प... आता म्हणाले, पुण्यात होणार...

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 28, 2023

राज्यातील या ५ शहरांमध्ये सुरू होणार लू लू मॉल तर येथे सुरू होणार अन्न प्रक्रिया उद्योग

March 28, 2023

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनेबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

March 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुण्याच्या पाणी पुरवठ्याबाबत पालकमंत्र्यांनी दिले हे निर्देश

March 28, 2023

नागरिकांना आता कमी दरात मिळणार वाळू… असा आहे सरकारचा मेगाप्लॅन…

March 28, 2023

पठाणच्या अभूतपूर्व यशानंतर शाहरुख खानने घेतली ही आलिशान कार… एवढी आहे तिची किंमत.. अशी आहेत वैशिष्ट्ये

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group