इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – नोएडा येथील नॅशनल बिल्डींग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन (एनबीसीसी)च्या माजी महाव्यवस्थापकाच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात रोकड, दागिने आणि इतर कागदपत्रे सापडल्याची माहिती आहे. ही रोकड एवढी आहे की, नोटा मोजण्याचे मशिन्स याठिकाणी मागविण्यात आले आहेत. नोएडातील सेक्टर १९ येथील घरी ही कारवाई सुरू आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, माजी अधिकाऱ्याचे नाव डी के मित्तल असे आहे. आतापर्यंत आयकर विभागाला कोट्यवधी रुपये सापडले आहेत. घरात मोठ्या प्रमाणात दागिने सापडल्याची माहिती समोर आली आहे. जप्त केलेली रक्कम आणि दागिन्यांचा तपशील सध्या आयकर अधिकार्यांनी सांगितलेला गेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ५० कोटींची मोजणी सुरू आहे. यासाठी दोन नोटा मोजण्याचे यंत्र मागवण्यात आले आहे.
झडतीदरम्यान आयकर पथकाला अनेक कागदपत्रेही देखील सापडली आहेत, ज्याबद्दल चौकशी केली जात आहे. मित्तल यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) करीत आहे. दरम्यान, रोख रक्कम मिळाल्याची माहिती मिळताच आयकर विभागाचे पथक डीके मित्तल यांच्या नोएडा येथील सेक्टर-१९ मधील घरी पोहोचले. मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्यानंतर आता नोटांची मोजणी सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन मशिनद्वारे नोटांची मोजणी सुरू आहे, मात्र अद्याप पूर्ण रक्कम मोजण्यात आलेली नाही. नक्की किती रोख रक्कम, दागिने आणि मालमत्ता सापडली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्याकडे प्रचंड संपत्ती आणि पैसा असल्याचे सांगितले जात आहे.
https://twitter.com/ANI/status/1545656771288907776?s=20&t=UOdm8w1eGDwv9eOXuwoxNw
Income Tax Department Raid NBCC Ex Officer got too much Wealth