मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून आज मुंबई, पुणे, नाशिकसह राज्याच्या अनेक भागात जोरदार हजेरी लावली आहे. मान्सूनसाठी अतिशय पोषक वातावरण सध्या आहे. त्यामुळेच राज्यात पुढील पाच दिवसासाठी भारतीय हवामानशास्त्राने इशारा दिला आहे. पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज विभागाने दिला आहे. तर, कोकणामध्ये पावसाची तीव्रता अधिक राहणार असल्याचे विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस संपूर्ण महाराष्ट्र चिंब होणार आहे. या वर्षातील मान्सूनचा हा पहिला दमदार पाऊस होणार आहे. या पावसानंतर राज्यभरात पेरणीचा हंगाम जोरात राहणार असल्याचा अंदाज आहे.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1535579279345459200?s=20&t=xcE-BRIN9Je2XWBWpRegwQ