नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य उत्पादन शुल्क कळवण विभाग व दिंडोरी भरारी पथकाने संयुक्त कारवाई करत पिंपळगाव टोलनाका येथे अवैध मद्यासाठा घेऊन जाणारा आयशर सिनेस्टाईल पाठलाग करत पकडला. या कारवाईत ३१ लाख ४२ हजार ८४० रुपयांच्या मुद्देमाल जप्त करुन वाहनचालक रविशंकर सुखराम पाल यास अटक करण्यात आलेली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पिंपळगाव टोलनाका येथे आयशर क्रमांक – MH 04 HD 1317 मालवाहतूक वाहनात प्लास्टिक गोण्यांच्या खाली परराज्यातील मद्याची अवैधरीत्या वाहतूक करताना आढल्यानंतर वाहन व मद्यसाठा जप्त करण्यात आला.
हा आहे जप्त केलेला मद्यसाठा
१) रॉयल स्पेशल प्रिमीयम व्हिस्कीच्या १८० मि.ली. क्षमतेच्या एकूण ८८८० सिलबंद बाटल्या.
(१८५ बॉक्स, दमण राज्यात निर्मात असुन दादरा नगर हवेली व दमण राज्यात विक्री करीता)
२) डिएसपी ब्लॅक डिलक्स व्हिस्कांच्या १८० मि.ली. क्षमतेच्या एकूण २०१६ सिलबंद बाटल्या.
(४२ बॉक्स, दमण राज्यात निर्मीत असून दादरा नगर हवेली व दमण राज्यात विक्री करीता )
३) दुबर्ग स्ट्रॉग प्रिमीयम बिअर ५०० मि.ली. क्षमतेचे एकुण १९२० टिन
(८० बॉक्स, महाराष्ट्र राज्यात निर्मीत असुन दादरा नगर हवेली & दमण राज्यात विक्री करीता )
४) हायवडंस ५००० सुपर स्ट्रॉंग बिअर ५०० मि.ली. क्षमतेचे एकुण ९६० टिन
(४० बॉक्स, महाराष्ट्र राज्यात निर्मात असुन दादरा नगर हवेली & दमण राज्यात विक्री करीता)
५) बिरावुम सुपर स्ट्रॉंग बिअर ५०० मि.ली. क्षमतेचे एकुण ७२० टिन
(३० बॉक्स, महाराष्ट्र राज्यात निर्मीत असुन दादरा नगर हवेली व दमण राज्यात विक्री करीता )
६) प्लॅस्टिक चे यारन कॅपच्या गोण्या
७) एक ओपो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल व एक साधा मोबाईल, आयशर वााहन ( एकुण ३७७ बॉक्स)
यांनी केली कारवाई
सदर गुन्हयातील संशयीत आंतराज्य मद्यतस्कारांचा शोध घेणे सुरु आहे. सदर कारवाई निरीक्षक एस. के. सहस्त्रबुध्दे, दुय्यम निरीक्षक एम. बी. सोनार, आर. एम. डमरे, एस. व्ही. देशमुख, जवान सर्वश्री. दिपक आव्हाड, विलास कुवर, एम.सी. सातपुते, पी.एम. वाईकर, सचिन पोरजे, गणेश शेवगे, सोमनाथ भांगरे, दिपक नेमणार, आण्णा बहिरम, गणेश वाघ यांनी यशस्वीरित्या पार पाडली. सदरील गुन्हयाचा तपास एस. के. सहस्त्रबुध्दे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क कळवण विभाग करीत आहे.