निफाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून निफाडमध्ये तर चक्क शेतीला पाणीपुरवठा करणा-या पाईपलाईनमध्ये पाण्याचे बर्फ तयार झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून हवेत गारठा असल्याने त्याचा हा परिणाम असल्याचे त्याद्वारे सांगण्यात येत आहे. अचानक पारा खाली गेल्याने सर्वांनाच हुडहुडी भरली आहे. त्यात निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथे या कडाक्याच्या थंडीमुळे पाईपलाईन मध्ये बर्फ तयार झाल्याचे या व्हिडिओ आणि व्हायरल पोस्टमध्ये सांगण्यात येत आहे. या पाईपमधील बर्फाचा व्हिडिओ एका शेतक-याने काढला असून तो सर्वत्र व्हायरल होत आहे….पण, हा व्हिडिओ आताचा आहे की जुना याबाबत खात्री होऊ शकली नाही. तसेच, हा व्हिडिओ म्हाळसाकोरेचा आहे किंवा नाही याबाबतही संदिग्धता आहे.