गुरूवार, सप्टेंबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

विश्वचषक स्पर्धेपूर्वी मोठा दणका! ऑस्ट्रेलियन कर्णधाराला शिवी देणे भोवले; ICCने केली ही कठोर कारवाई

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 12, 2022 | 10:36 am
in संमिश्र वार्ता
0
FexjXLiX0AEN3PV

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – क्रिकेट सरावा दरम्यान खेळत असताना ऑस्ट्रेलिया टीमचा कॅप्टन आरोन पिंच याने मोठ्याने शिवी दिल्याने ती स्टंपच्या माईक मध्ये रेकॉर्ड झाली आहे, असे बीसीसीआयचे म्हणणे असून पिंचवर कारवाई करीत त्याला संघातून काढून टाकण्याची शक्यता आहे. त्यामुळे बलाढ्य असलेल्या ऑस्टेलिया संघासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

एकीकडे दिवाळी सणाची तयारी लगबग सुरू असताना या काळात क्रिकेट प्रेमींसाठी देखील मोठी पर्वणी ठरणार आहे. कारण टी ट्वेंटी वर्ल्ड कप सामने ऑस्ट्रेलिया येथे होणार असून त्यासाठी अन्य संघांसह भारतीय संघही (टीम इंडिया ) ऑस्ट्रेलिया येथे रवाना झाला आहे, येथे सराव सामने सुरू असून प्रत्यक्ष सामन्यास दि. २२ ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे, एकीकडे ऑस्ट्रेलिया व आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकल्याने टिम इंडियाच्या खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असताना दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघापुढे एक वेगळे संकट उभे राहिले आहे. कारण ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार आरोन फिंच याने शिवी दिल्याने त्याला बाहेरचा रस्ता दाखविण्यात येण्याची शक्यता आहे.

खरे म्हणजे ऑस्ट्रेलियाचा संघाचा कर्णधार आरोन फिंचने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. फिंचने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आगामी टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी वनडे विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला असताना त्याच्याबद्दल आता नवा वाद उद्भवला आहे.

संघाचा विद्यमान कर्णधार अॅरॉन फिंचचे वय ४५ वर्ष असून फिंच गेल्या काही काळापासून खराब फॉर्ममुळे चांगल्या खेळासाठी संघर्ष करत आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधाराच्या बॅटची शेवटची मोठी इनिंग यंदा जूनमध्ये श्रीलंकेविरुद्ध पाहायला मिळाली होती. २०१३ मध्ये आरोन फिंचने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आरोन फिंचने त्याच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीत आतापर्यंत एकूण १४५ सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये फिंचने सरासरीने ५४०१ धावा केल्या असून यामध्ये १७ शतकांचा सामावेश आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग, मार्क वॉ आणि डेविड वॉर्नर यांच्यानंतर ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक शतक झळकावणारा फिंच हा चांगला फलंदाजही आहे. मात्र असे असताना गेल्या वर्षीच्या टी -२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावणाऱ्या या संघावर सध्या धोक्याची घंटा वाजत आहे. टी-२० विश्वचषकाच्या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व ॲरॉन फिंच करणार असून ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना दि. २२ ऑक्टोबरला न्यूझीलंडशी होणार आहे.

आयसीसीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, इंग्लंडच्या डावाच्या एका षटकात ॲरॉन फिंचने दिलेली शिवी तसेच तो जे बोलला ते, स्टंप माईकवर रेकॉर्ड झाले आहे. या कारणामुळेच, ॲरॉन फिंचला आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलमाचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे. ॲरॉन फिंचने हे आरोप मान्य केले असून यासंदर्भात त्याच्या शिस्तबद्ध रेकॉर्डमध्ये एक मुद्दा नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजेच भविष्यात त्याने असे काही काम केल्यास त्याच्यावर मोठी कारवाई होऊ शकते.

वास्तविक गेल्या दोन वर्षांतील ॲरॉन फिंचचा अशा प्रकारे शिवी देणे पहिलाच गुन्हा असला तरीही त्याला धोका आहे, कारण आयसीसीच्या नियमांनुसार एखाद्या खेळाडूच्या शिस्तीच्या रेकॉर्डमध्ये चार गुण वजा झाल्यास त्या खेळाडूवर बंदी घातली जाऊ शकते. म्हणजेच फिंचने त्याच्या चुकीची पुनरावृत्ती केल्यास तो इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतून किंवा टी-२० विश्वचषकातूनही बाहेर होऊ शकतो. खरे म्हणजे क्रिकेट सामना दरम्यान एखाद्या खेळाडूने शिवीगाळ करणे ही गोष्ट काही नवीन नाही परंतु आता याबाबत अत्यंत कठोर आणि कडक नियम करण्यात आले आहे.

विश्वचषकासाठी भारतीय संघ असा
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियन संघ असा
ॲरॉन फिंच (कर्णधार), मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, मार्कस स्टॉइनिस, ॲश्टन अगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क आणि ॲडम झाम्पा.

ICC Action Austrelian Captain Aaron Finch

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अंधेरी पूर्व मतदार संघाच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग; सेनेच्या लटके यांची उमेदवारी धोक्यात?

Next Post

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंवर गुन्हा दाखल; आता भास्कर जाधवांना अटक होणार?

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

ASHTAVINAYAK 2 1024x682 1
राज्य

अष्टविनायक विकास आराखडा….उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले हे निर्देश

सप्टेंबर 11, 2025
crime 88
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया भागात चार घरफोड्या…तीन लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

सप्टेंबर 11, 2025
Untitled 11
संमिश्र वार्ता

धक्कादायक….महसूल अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी रेती माफियांकडून ड्रोनचा वापर

सप्टेंबर 11, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1
संमिश्र वार्ता

लाडकी बहिण योजनेतील ऑगस्टचा सन्मान निधी तुमच्या खात्यात जमा झाला का? चेक करा बँक खाते

सप्टेंबर 11, 2025
crime1
क्राईम डायरी

नाशिकच्या महिलेसह तिघांना सव्वा कोटीला गंडा….अशी केली फसवणूक

सप्टेंबर 11, 2025
Untitled 10
संमिश्र वार्ता

यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड…१२ ठिकाणी छापे, ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त

सप्टेंबर 11, 2025
SUPRIME COURT 1
संमिश्र वार्ता

भारत – पाकिस्तान सामना रद्द करण्यासाठी याचिका…सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निर्णय

सप्टेंबर 11, 2025
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274
महत्त्वाच्या बातम्या

सिंदूर के सन्मान मै, शिवसेना मैदान मै…भारत – पाकिस्तान सामन्याच्या दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन

सप्टेंबर 11, 2025
Next Post
Shinde Thackeray

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंवर गुन्हा दाखल; आता भास्कर जाधवांना अटक होणार?

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011