नाशिक – नाशिक महसूल विभाग राज्य सेवा हक्क आयुक्तपदी सनदी अधिकारी चित्रा कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी तसे आदेश काढले आहेत. या नियुक्तीला राज्यपालांनी मान्यता दिली आहे. कुलकर्णी यांना क्षत्रिय यांच्या मुंबईतील कार्यालयात आज शपथ दिली जाणार आहे.










