India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

ह्युंदाईच्या या जबरदस्त कारचे बुकींग सुरू; टाटा, मारुती, किया सर्वांचेच टेन्शन वाढले

India Darpan by India Darpan
May 10, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दक्षिण कोरियाची कार कंपनी Hyundai कडून भारतात लवकरच एक नवीन SUV लाँच केली जाणार आहे.  कंपनीने SUV साठी बुकिंग सुरु केले आहे. यासोबतच कंपनीने एसयूव्हीच्या डिझाईनचा खुलासा केला आहे. तसेच या एसयूव्हीमध्ये इंजिन पॉवरफुल आहे.

Hyundai ने लॉन्च होण्यापूर्वी नवीन SUV Exter साठी बुकिंग सुरू केले आहे. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, एसयूव्ही 11,000 रुपयांमध्ये ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये डीलरशिपद्वारे बुक केली जाऊ शकते.

नवीन एसयूव्ही कंपनी तीन पॉवरट्रेनच्या पर्यायासह आणणार आहे. 1.2L कप्पा पेट्रोल इंजिन पाच-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि स्मार्ट ऑटो AMT सह इथेनॉल-20 अनुरूप असेल. याशिवाय, एसयूव्ही सीएनजीसह आणली जाईल. यात 1.2-लिटर द्वि-इंधन कप्पा पेट्रोल आणि CNG इंजिनसह पाच-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन मिळेल.

Imagine lying under a canopy of twinkling stars. Feel the splash of a wild waterfall. Think outside. Think EXTER. The all-new SUV #HyundaiEXTER is coming soon to take you places.
Know more: https://t.co/JgP6L0MUai#Hyundai #HyundaiIndia #Thinkoutside #ComingSoon #ILoveHyundai pic.twitter.com/wAUTDuXSP0

— Hyundai India (@HyundaiIndia) April 14, 2023

Hyundai च्या नवीन SUV Exter मध्ये एकूण पाच प्रकार सादर केले जातील. बेस व्हेरिएंट EX असेल. त्यानंतर S, SX, SX Optional आणि SX Optional जोडले जातील. एसयूव्ही सहा मोनोटोन आणि तीन ड्युअल टोन बाह्य रंगांच्या निवडीसह सादर केली जाईल. ज्यामध्ये कॉस्मिक ब्लू आणि रेंजर खाकी या नवीन रंगांचा समावेश करण्यात येणार आहे.

कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, Hyundai Xtor मध्ये LED DRL with S signature, Diamond cut alloy wheels सारखे फीचर्स मिळतील. यासोबतच 10-इंच इन्फोटेनमेंट टचस्क्रीन, अॅपल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो, अॅम्बियंट लाइट, सनरूफ, रियर एसी व्हेंट्स, एबीएस, ईबीडी, एअरबॅग्ज, एचएसए आणि टीपीएमएस सारखे फीचर्सही एसयूव्हीमध्ये दिले जाऊ शकतात.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नुकतेच सोशल मीडियावर एसयूव्हीच्या बाह्य डिझाइनचे तपशील लीक झाले आहेत. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये एसयूव्हीचा फ्रंट लूक, रियर लूक, साइड प्रोफाईल तसेच इंटिरियरची झलकही दिसली.

Damn, this is a game changing tech. @Hyundai_Global @HyundaiIndia #HyundaiEXTER #hyundai pic.twitter.com/Ow2NPpBVh7

— Jatin Gupta (@jatingupta0003) May 6, 2023

Hyundai SUV Car Exter Booking Open


Previous Post

पुलंच्या कथा आता ऑडिओ बुक स्वरुपात… या अभिनेत्याच्या आवाजात ऐकायला मिळणार…

Next Post

…म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकात प्रचारासाठी गेले

Next Post

...म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकात प्रचारासाठी गेले

ताज्या बातम्या

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस; जाणून घ्या, सोमवार, २९ मे २०२३चे राशिभविष्य

May 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – सोमवार – २९ मे २०२३

May 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पत्नीचे बर्थडे गिफ्ट

May 28, 2023

३५६ कोटी खर्च… मोदींच्या हस्ते उदघाटन…. महाकाल कॉरिडॉरच्या कामांचे पितळ उघड…. वादळाने मूर्ती कोसळल्या

May 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

कांदा प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदानासाठी मुदतवाढ?

May 28, 2023

उत्तर महाराष्ट्रातील तरुणांना रोजगारासाठी ‘ट्रान्सपोर्टचा एक्स्पो’ ठरला रेड कार्पेट; १२१ युवकांना आॅफर लेटर.. घसघशीत पगाराची नोकरी

May 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group