हैदराबाद – हैदराबाद प्राणिसंग्रहालयात आठ प्राणीसंग्रहालय कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या सिंहांच्या लाळच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. सेंटर फॉर सेल्युलर अणि आण्विक जीवशास्त्र संस्थेचे (सीएसआयआर) मुख्य सल्लागार राकेश मिश्रा यांनी त्यास दुजोरा दिला आहे.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने म्हटले आहे की, या सिंहांना झालेल्या कोरोना संसर्ग हा जास्त प्राणघातक स्वरूपाचा नाही. संसर्ग झाल्यापासून हे आठ सिंह वेगवेगळे ठेवले होते. आता त्यांना उपचारांचा लाभ होत असून त्यांचे आरोग्य वेगाने सुधारत आहे. यापूर्वी मानवाकडून प्राण्यांमध्ये या संसर्गाचे कोणतेही प्रत्यक्ष पुरावे नव्हते. तसेच नेहरू प्राणीशास्त्र उद्यानात उपस्थित असलेल्या सिंहांमध्ये नवीन स्वरूपांचे संक्रमण नाही. तर मिश्रा यांनी लोकांना समजावून सांगितले की, या संक्रमित सिंहामुळे येथील कर्मचार्यांसह अन्य प्राणीही संसर्ग होऊ शकतात.
याबाबत केंद्र सरकारने खालील निवेदन प्रसिद्ध केले आहे
अत्यंत सावधगिरी बाळगत हैदराबाद येथील नेहरू प्राणिसंग्रहालयाने श्वसनाचा त्रास होत असल्याची लक्षणे असलेल्या आठ आशियाई सिंहांचे सीसीएमबी-लॅकोन्स याना (नाक, घसा आणि श्वसनमार्गातून संकलित) नमुने सामायिक केले. 4 मे 2021 रोजी सीसीएमबी-लॅकोन्स यांनी सामायिक केलेल्या तपशीलवार निदान चाचण्या आणि अहवालाच्या आधारे, स्पष्ट झाले आहे की नेहरू प्राणिसंग्रहालय (एनझेडपी), हैदराबाद येथे ठेवलेल्या आठ आशियाई सिंहांना सार्स सीओव्ही 2 विषाणूची लागण झाली आहे.
नमुन्यांचे आणखी विश्लेषण केल्यावर असे आढळून आले आहे की हा संसर्ग चिंताजनक नाही. आठ सिंहांना अलगीकरणात ठेवले असून योग्य काळजी आणि आवश्यक उपचार केले जात आहेत. सर्व आठ सिंहांनी उपचारांना चांगला प्रतिसाद दिला आहे. ते नेहमीप्रमाणेच वागत असून खाणे व्यवस्थित आहे. प्राणिसंग्रहालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत आणि बाह्य संपर्क होऊ नये म्हणून प्राणीसंग्रहालय अभ्यागतांसाठी बंद करण्यात आले आहे.
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने सार्स सीओव्ही -2 च्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर प्राणीसंग्रहालयासाठी सावधगिरीचे दिशानिर्देश आणि मार्गदर्शक सूचना जारी करण्याबरोबरच अनेक पूर्व-उपाययोजना केल्या आहेत.
भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था (आयव्हीआरआय) उत्तर प्रदेश आणि सेल्युलर अणि मोलेक्युलर जीवशास्त्र केंद्र – लुप्त होणार्या प्रजातींचे संवर्धन करण्यासाठी प्रयोगशाळा (सीसीएमबी-लेकोन्स) हैदराबाद यासारख्या वैज्ञानिक संस्था आणि तज्ञांशी सल्लामसलत केल्यावर प्रतिबंध, नमुना संकलन, संशयित प्रकरणांचा शोध आणि पशुपालन करणाऱ्यांसाठी सुरक्षा विषयक नियम यावर देखरेख आणि मार्गदर्शक सूचना प्राणीसंग्रहालयांसाठी सुचवण्यात आल्या आहेत . या सूचना http://cza.nic.in/news/en वर सहज उपलब्ध आहेत.
पुढील उपाययोजनांचा एक भाग म्हणून, तज्ञांच्या सल्ल्यानुसार कोविड खबरदारीसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे विकसित केली जात आहेत. अतिरिक्त माहिती लवकरच दिली जाईल.
जगातील इतर प्राणीसंग्रहालयांमध्ये जिथे गेल्या वर्षी सार्स -सीओव्ही 2 पॉझिटिव्ह आढळला होता, त्यांच्या अनुभवाच्या आधारे प्राणी हा रोग मानवांमध्ये संक्रमित करू शकतो याबद्दल कोणतेही पुरावे नाहीत. म्हणूनच माध्यमांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी याबाबत वृत्तांकन अत्यंत सावधपणे आणि जबाबदारीने करावे