इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – स्मार्टफोनचे इतके प्रचंड व्यसन अनेकांना लागले आहे की त्यामुळे आपल्या कानी विविध वार्ता येऊन धडकतात. आताही असाच एक अजब प्रकार समोर आला आहे. एका कुटुंबातील या घटनेची सध्या देशभरात चर्चा होत आहे.
राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात असलेल्या गाझियाबादमध्ये हा प्रकार घडला आहे. एका महिलेला स्मार्टफोनचे एवढे व्यसन लागले की तिने स्मार्टफोनऐवजी चक्क पतीलाच सोडचिठ्ठी दिली आहे. कौटुंबिक समुपदेशन केंद्रात हा प्रकार पोहचला आहे. मोबाईल स्मार्टफोन पती-पत्नीमधील वादाचे कारण बनला आहे. पत्नीला मोबाईलचे इतके व्यसन जोडले आहे की तिच्यासाठी नवऱ्यापेक्षा फोनचं महत्त्व जास्त झाले आहे.
पतीने सांगितले की, पत्नी दिवसभर मोबाईलमध्ये गुंतलेली असते. ती दिवसभर नातेवाईक, बहीण, भावजई यांना व्हिडिओ कॉल करत असते. त्यामुळे मी पत्नीला म्हणालो की, मी तिचा स्मार्ट फोन काढून घेईन आणि साधा कीपॅडचा मोबाईल फोन देईन. जेणेकरून ती व्हिडिओ कॉल करू शकणार नाही. ती दिवसभर तिच्या बहिणीला आणि भावाला व्हिडिओ कॉल करते. तिची बहीणही मला कॉलवर शिवीगाळ करते आणि यासंदर्भात पत्नी बहिणीला काहीच बोलत नाही. त्याचवेळी बायको ठाम असते की मला फक्त स्मार्ट फोन ठेवायचा आहे. या वादातून अखेर पत्नी माहेरी गेली आहे.
कौटुंबिक समुपदेशन केंद्राच्या प्रभारी नेहा चौहान यांनी सांगितले की, महिलेला खूप समजावले होते पण ती स्मार्ट फोनवर ठाम राहिली. महिलेच्या भावांनीही तिला समजावले पण ती मानायला तयार नाही. समुपदेशकाने दोघांची समजूत घातली आणि एकत्र घरी पाठवून पुढची तारीख दिली. समुपदेशक बबिता शर्मा यांनी सांगितले की, पतीने एक व्हिडिओ देखील दाखवला होता ज्यामध्ये पत्नी पतीला मारहाण करत आहे.
Husband Wife Dispute Smartphone Habit