पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोणत्याही सणासाठी सोशल मीडियावरून शुभेच्छा पाठवणे, हे आता नेहमीचंच झालं आहे. त्यातही आता वैविध्य येत असून सणाबरहुकूम स्टिकर्सही येत आहेत. हे स्टीकर्स फार कल्पक असतात. तुम्हालाही तुमच्या दोस्तांना, नातेवाईकांना असे स्टिकर्स पाठवायचे आहेत का? चला तर मग आम्ही सांगतो काय करायचं ते.
व्हॉट्सऍप ओपन करून ज्याला स्टीकर पाठवायचा आहे, त्याची चॅट विंडो ओपन करा. तिथे असलेल्या स्मायली बटणावर क्लिक करा. तुम्हाला सध्या जे स्टीकर्स मिळू शकतात, ते तुम्हाला तिथे दिसतील. मग तुम्ही स्टीकर आयकॉनवर क्लिक करा. तिथे उजवीकडे तुम्हाला प्लस चं चिन्ह दिसेल. त्यावर क्लिक करून स्क्रोल डाऊन केलं की get more stickers असा पर्याय दिसेल. इथे क्लिक केल्यावर तुम्ही गुगल प्ले स्टोअरला जाल. तिथे जाऊन होळीसाठी कोणते स्टीकर्स आहेत ते सर्च करा. तुम्हाला हवे ते स्टीकर्स डाऊनलोड करून घ्या. ते ओपन केले की ऍड टू व्हॉट्सऍप असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर पुन्हा व्हॉट्सऍपला जा. आपल्या आवडीचे स्टीकर निवडून ते ज्याला पाठवायचे त्याला पाठवून द्या.
आयएसओ युझर्ससाठी अशाप्रकारे बाहेरून स्टीकर्स डाउनलोड करण्याला परवानगी नाही. पण तुम्हाला जर कोणते स्टीकर्स आले असतील तर ते तुम्ही सेव्ह करू शकता. त्यामुळे व्हॉट्सऍपवर स्टीकर आले तर ते फेव्हरिट मध्ये टाकून द्या. नंतर ज्याला पाठवायचा त्याला तो पाठवू शकता.