इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कुटुंबासोबत प्रवासात कार सारखे कोणतेही चार चाकी वाहन चालविताना नेहमीच काळजी घ्यावी लागते. विशेषतः प्रवासात लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक असेल तर त्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. इतकेच नव्हे तर कार मध्ये बसण्यापूर्वी किंवा प्रवास संपल्यावर किंवा रस्त्यात एखाद्या ठिकाणी थांबल्यावर लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना चढताना आणि उतरताना कार लॉक करण्यापूर्वी काळजी घेतली नाही, तर दुर्घटना घडू शकते.
विशेषतः कार मध्ये लहान बालके अडकून पडण्याचे प्रकार आपण नेहमीच ऐकतो. अशाच प्रकारची एक घटना मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये घडली. यात अडकलेल्या मुलाला बाहेर काढण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. मुलाचे मामा राजेश यादव यांनी सांगितले की, संध्याकाळच्या सुमारास ते सर्वजण कारने पन्ना रोडला पोहोचले होते. सर्वजण गाडीतून बाहेर आले, पण एक वर्षाचा चिकू आतच राहिला. मुलाला बाहेर काढण्याआधीच त्याने चुकून दरवाजा आतून लावला. त्यानंतर जेव्हा घरातील सदस्यांना गाडी उघडायची होती. तेव्हा चावीही आत राहिल्याचे त्यांना समजले.
काही वेळ मुल आत खेळत राहिले, पण बाहेर उभ्या असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी गाडीचे दार लवअखेर कारची काच फोडून मुलाला बाहेर काढण्यात आले. या दरम्यान बालक आतमध्ये रडत राहिले. कार उघडली नाही, तेव्हा ते मूल रडायला लागले. त्याचा कारमध्ये जीव गुदमरू लागला, परंतु नेमके काय करावे? हे कोणालाच कळेना! नुसताच आरडाओरडा सुरू झाला. त्यानंतर तेथे मोठी गर्दी झाली. बाहेर उभ्या असलेल्या कुटुंबियांची अवस्था बिकट होत चालली होती. त्याचवेळी आतील मूलही अस्वस्थ झाले आणि रडू लागले. यानंतर चालकाच्या बाजूने कारची काच फोडून मुलाला बाहेर काढण्यात आले. उतरण्यापुर्वी मुलाला गाडीतून आधी बाहेर काढायला हवे होते, मात्र आम्ही करू शकलो नाही, त्यामुळे मुलगा गाडीत अडकला, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.