आजचे राशिभविष्य
शनिवार – २८ जानेवारी २०२३
मेष – वाहन चालवताना हळू चालवा. कायदे तोडू नका
वृषभ – शत्रूपासून सावध राहा
मिथुन – अचानक धनलाभ. कार्यक्षेत्रात प्रगतीचे योग
कर्क – वातावरण आनंदी राहील. सौख्य लाभ
सिंह – सरकारी काम करत असाल तर त्यामध्ये लक्ष घाला
कन्या – प्रकृतीची काळजी घ्या
तुळ – जोडीदाराचे सहकार्य मिळेल
वृश्चिक – धनलाभ होऊ शकतो
धनु – कार्य करताना काळजी घ्या
मकर – खाण्यापिण्यावर बंधने घाला
कुंभ – कुटुंब व मित्रपरिवाराबरोबर दिवस आनंदात जाईल
मीन – पाहुणे मंडळी वर खर्च करावा लागेल
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते दहा तीस यावेळेस महत्त्वाची कामे टाळा
आज आहे रथसप्तमी
आज रथसप्तमी आणि त्यानंतर लगेच काही वेळाने भीमा अष्टमी हे दोन्हीही योग आलेले आहेत. अरुणोदय काळी स्नान करून रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती रक्तचंदनाने पाटावर काढावी. त्याची पूजा करावी. पेटलेल्या गौऱ्यांवर मातीचे सुगड दुधासह ठेवावे. ते सूर्यास अर्पण करावे. भीमा अष्टमी या दिवशी पितामह भीष्म यांचे उद्देशाने दर्पण विधी केला, तर त्याने समूळ पापनाश होतो, अशी धारणा आहे. दुपारी बारा वाजता पिंपळाच्या झाडाखाली थोडी साखर किंवा गूळ खोबरे असे ठेवावे. त्याने आपल्या पित्रांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील.