आपली रास मकर आहे का?
२०२३ हे वर्ष तुम्हाला असं जाईल
वाचकांच्या आग्रहास्तव सर्व बारा राशींच्या व्यक्तींना नवे वर्ष कसे जाणार याबाबतचा रोज एका राशीचा अंदाज आपण दहा टिप्सच्या स्वरूपात देत आहोत. यापूर्वी आपण दोन राशींची माहिती घेतली. आज आपण मकर राशीविषयी जाणून घेऊया.
ज्या व्यक्तींच्या नावाचे अद्याक्षर हे भो, जा, जी, खी, खू, खे, खो, गा, गी है असते त्या व्यक्ती मकर राशीच्या असतात. या राशीचा स्वामी हा शनी आहे. या राशीच्या व्यक्ती व्यवहारी असतात. तसेच त्यांच्याकडे धोरण असते. या व्यक्ती महत्त्वाकांक्षी असतात. त्यामुळे त्यादृष्टीने ते प्रयत्न करीत असतात. शिवाय या राशीच्या व्यक्ती शिस्तप्रिय असतात.
आता आपण २०२३ या वर्षासाठीच्या मकर राशीच्या टीप्स जाणून घेऊ…
१) मकर राशीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी यंदाच्या वर्षी अनेक शुभवार्ता मिळणार आहेत. हव्या त्या क्षेत्रात संधी मिळणे गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळणे अपेक्षे सारखे मार्क मिळणे इत्यादी….
२) भागीदारी व्यवसाय करणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. भागीदारांसाठी आवश्यक सर्व कागदपत्रे तयार करून घ्यावेत.
३) महिला वर्गाला त्यांच्या कार्यक्षेत्रात गौरवित यश मिळणार आहे. बढतीचे योग आहेत..
४) आर्थिक व्यवहाराबाबत कोणत्याही तात्काळ फायद्याच्या अथवा अपेक्षेपेक्षा जास्त रिटर्न देणाऱ्या स्कीम मध्ये पैसे गुंतवणूक करू नये…
५) पाय तसेच कमरेसंबंधातील दुखणे नसांचे आखडणे याकडे दुर्लक्ष नको..
६) विवाह इच्छुकांचे कार्य यंदा झटकेपट ठरणार आहे..
७) मकर राशीच्या व्यवसायिकांना व्यवसायाचे नूतनीकरण, व्यवसाय शाखा वाढ, भांडवल पुरवठा या बाबतीत चांगले अनुभव येणार आहेत..
८) कोर्ट कचेरीच्या कामात यश लागणार आहे…
९) अभ्यासपूर्ण पाठपुरावां न केल्यास, महत्त्वाच्या संधींना विशेष महत्त्व न दिल्यास अतिशय महत्त्वाच्या संधी हातातून सुटू शकतात..
१०) वादग्रस्त व्यक्तींबरोबर संबंध ठेवू नये..
टीप – वरील टिप्स या मकर राशीसाठी सर्वसमावेशक आहेत. मिथुन राशीत असलेली *धनिष्ठा,श्रवण, उत्तराशाढा* या नक्षत्राप्रमाणे भिन्न तसेच कुंडली पाहून व्यक्तिगत सविस्तर सल्ला दिला जाईल….
महाराष्ट्रभर वास्तु व्हिजिट कॉम्प्युटर कुंडली शुभनवरत्न व्यक्तिगत सविस्तर ज्येष्ठ मार्गदर्शन भवानी ज्योतिष.. पं. दिनेशपंत ..फक्त व्हाट्सअप संपर्क 9373 91 34 84.