आपली रास आणि अर्थव्यवहार यांचा नेमका संबंध
आपली रास आणि अर्थव्यवहार या मालिकेत मागच्या सप्ताहात आपण राशीनुसार आर्थिक व्यवहार हे कन्या राशिपर्यंत बघितले. यावेळी पुढील सहा राशी बघू….

व्हॉटसअॅप – 9373913484
तूळ – बरेचदा फारसा व्यवहारिक विचार न करता, फारसा तर्कसंगत व्यवहार आपण करत नाहीत. कुणाला तरी मदत व्हावी, प्रत्येकवेळी काय आपला फायदाच बघायचा अशा विचारात असतात. त्यामुळे अनाकलनीय मोठे आर्थिक व्यवहार होऊन बसतात. सर्वंकष विचार करून व्यवहार करावा…..
वृश्चिक – कोणतेही आर्थिक व्यवहाराबाबतीत अनेक दिवस विचार करून निर्णय घेण्याची आपली पद्धत असते. काही वेळा ती योग्य असते. परंतु बरेचदा आर्थिक व्यवहार करण्याची चांगली संधी हातची जाते. योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा. रेंगाळलेले व्यवहार वेळेत पूर्ण करावे…..
धनु – आर्थिक व्यवहार करण्यासाठी आपण संबंधित आर्थिक व्यवहार केलेल्या अनेक जणांना भेटून त्यांचे अनुभव काय आले अशाप्रकारे अनेकदा निर्णय घेत असतात. परंतु ज्याचा त्याचा अनुभव वेगळा असतो. त्यामुळे इतरांचे अनुभव आपल्या फारसे उपयोगी येत नाहीत. पण आपल्या अनुभवाने निर्णय घ्यावा……
मकर – एका व्यवहाराची सांगड आपण दुसऱ्या व्यवहाराशी घालता. एका व्यवहारातील पैसा दुसरा व्यवहारात वापरायचा प्रयत्न करता. सरळ सरळ असे व्यवहार करण्याचे बघावे. व्यवहार दुसऱ्यावर अवलंबून ठेवल्यास दोन्ही व्यवहार होत नाहीत……
कुंभ – आपले बहुतांश आर्थिक निर्णय इतरांवर अवलंबून असतात. घरातली मंडळी, मित्रमंडळी, परिचित सल्लागार या सर्वांशी चर्चेच्या भरपूर फेऱ्या होतात. ते झाल्यानंतर एखादा आर्थिक निर्णय घेण्यापर्यंत आपण पोहोचता. प्रत्येक जण आपला सर्वांगाने विचार करूनच सल्ला देईल असे नसते. फार चर्चेच्या फेऱ्यांमध्ये न अडकता निर्णय घ्यावा…..
मीन – छोट्या वा मोठ्या आर्थिक निर्णयाबाबत अनेकदा द्विधा मनस्थिती असते. करू की नको करू, जाऊ की नको जाऊ. येऊ की नको येऊ या विचारात असतात. अनेकदा आजच्या चांगल्या संधी निघून जातात. ठाम राहा आणि निर्णय घ्या…..
पुढील आठवड्यात आपले राशी नक्षत्रानुसार लकी नंबरची माहिती पाहू…