शुक्रवार, सप्टेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिककरांनो, ही संधी चुकवू नका! तब्बल ४० हजार जणांनी दिली भेट; होमेथॉन प्रदर्शनाचा उद्या शेवटचा दिवस

नरेडको होमेथॉन २०२२ प्रॉपर्टी एक्स्पो प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत नागरिकांसाठी खुले

by Gautam Sancheti
डिसेंबर 24, 2022 | 9:27 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20221224 WA0027 e1671897298529

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नरेडकोच्या होमेथॉन २०२२ प्रॉपर्टी एक्स्पो प्रदर्शनाचा दि.२२ डिसेंबर पासून प्रारंभ झाला असून उद्या, रविवार, दि. २५ डिसेंबर रोजी या प्रदर्शनाचा समारोप होणार आहे. याप्रसंगी खासदार आणि शहरासह जिल्हयातील आमदारांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून या प्रदर्शनाचे प्रमुख प्रायोजक देखील या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे या प्रदर्शनास प्रचंड प्रतिसाद लाभला असून गेले ३ दिवस या प्रदर्शनाला सुमारे ४० हजार नागरिकांनी भेट दिली असून ३ दिवसात सुमारे २२७ ग्राहकांनी घरांचे आणि शॉपचे बुकिंग केले आहे.

सर्वसामान्यांच्या स्वप्नातील व वाजवीदराच्या घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) तर्फे २२ ते २५ डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत ” होमेथॉन २०२२ प्रॉपर्टी एक्स्पो” प्रदर्शन गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे आयोजित करण्यात आले असून प्रदर्शनाचे समारोप आज रविवार, दि. २५ रोजी होणार आहे. तर समारोप सोहळा व्यासपीठावर नरेडकोचे नाशिक अध्यक्ष अभय तातेड, नरेडकोचे सचिव सुनील गवादे, होमेथॉनचे समन्वयक जयेश ठक्कर , सहसमन्वयक शंतनु देशपांडे, होमेथॉनचे प्रायोजक व दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक दीपक चंदे, होमेथॉनचे सहप्रायोजक व सिटी लिफ्टचे संचालक नवीन राजगोपालन, Enviro चे संचालक सौरभ देसाई, के नेस्टच्या प्रियंका यादव, युनियन बँक ऑफ इंडिया चे डेप्युटी जनरल मॅनेजर सुमेर सिंग आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, तसेच समारोपाच्या समारंभास प्रचंड संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

होमेथॉन प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी अविनाश शिरोडे, पुरुषोत्तम देशपांडे, राजेंद्र बागड, भाविक ठक्कर, मयूर कपाटे, अश्विन आव्हाड, प्रशांत पाटील, नितीन पाटील, भूषण महाजन, श्रीहर्ष घुगे, आदी प्रयत्नशील आहेत. या प्रदर्शनात गिफ्ट पार्टनर म्हणून तेजस्वी ज्वेलर्स परेश शहा यांचे विशेष सहकार्य लाभले. दरम्यान, प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी उद्घाटन सोहळयास प्रमुख अतिथी म्हणून विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक मनपा आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार आदींसह मान्यवर उपस्थित होते. तसेच गेल्या चार दिवसात या प्रदर्शनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रामुख्याने स्वामीह फंडाचे चिफ फायनान्स ऑफिसर इरफान काझी यांनी भेट दिली. तसेच नाशिकमधील बांधकाम व्यावसायिक आणि विकासकांना मार्गदर्शन केले.

होमेथॉन प्रदर्शनाच्या ब्रँड अँबेसिडर आणि प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन सर्वांशी संवाद साधला. यावेळी प्राजक्ता माळी यांची मुलाखत देखील चांगलीच रंगली होती. या प्रदर्शनास त्र्यंबकेश्वर येथील श्री रामकृष्ण आरोग्य संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी कंठानंद महाराज यांनीही भेट देऊन प्रदर्शनाच्या पदाधिकारी आणि संयोजकांना शुभेच्छापर आशीर्वाद दिले. त्याचप्रमाणे माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार देवयानी फरांदे, भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, विजय साने, शिवाजी गांगुर्डे आदीसह नाशिक शहरासह जिल्ह्यातील आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक आदि क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या प्रदर्शनास भेट दिली.

प्रथमच सहभाग घेऊनही ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
होमेथॉन प्रदर्शनात स्टॉल लावलेले प्रभावी कन्स्ट्रक्शनचे हेमंत गायकवाड यांनी सांगितले की, आम्ही प्रथमच या प्रदर्शनास स्टॉल लावला असून या प्रदर्शनात ग्राहकांचा अत्यंत चांगला अनुभव येत आहे. वास्तविक पाहता आमचा प्रोजेक्ट नाशिकरोडला असून आम्ही जयेशभाई ठक्कर यांच्या आग्रहावरून स्टॉल लावला असून अनेक ग्राहक अत्यंत उत्साहाने आमच्या प्रोजेक्टची माहिती घेत आहेत. तसेच प्रदर्शनाला प्रचंड नागरिक मोठ्या संख्येने नागरिक भेट देत असून नाशिकरोड, जेलरोड, देवळाली कॅम्प, देवळालीगाव भागातील नागरिक देखील या प्रदर्शनाला भेट देत असून आणखी या भागातील नागरिकांनी प्रदर्शनास भेट द्यावी, अशी आमची विनंती आहे, तसेच या ठिकाणी विविध प्रकारचे प्रकल्प फ्लॅट अत्यंत बजेटमध्ये उपलब्ध असून प्रत्येकासाठी येथे घर घेण्याची चांगली संधी उपलब्ध झालेली आहे.

सर्वसामान्य ते उच्चभ्रू नागरिकांसाठी पर्वणी
१ ) नाशिक मधील कॅनडा कॉर्नरभागातील रहीवासी व सेवानिवृत्त अधिकारी उमेश कुंभोजकर यांनी या प्रदर्शनास भेट दिली असता सांगितले की, होमेथॉन प्रदर्शनाचा उपक्रम अत्यंत चांगला असून यातून अनेक गृहप्रकल्पांची माहिती मिळते. तसेच येथील डिस्प्ले आणि मांडणीची सर्व व्यवस्था अत्यंत उत्कृष्ट आहे. त्याचप्रमाणे प्रेझेंटेशन देखील चांगले असून नागरिकांना फ्लॅट घेण्याची इच्छा होते. तसेच मलादेखील येथे येऊन फ्लॅट खरेदी करण्याची इच्छा झाली आहे.
२ ) सायखेडा ( ता. निफाड ) येथील शिक्षक असलेले दांपत्य सोमनाथ शिंदे व सुवर्णा शिंदे यांनी सांगितले की, होमेथॉन प्रदर्शन बघून आम्हाला अत्यंत आनंद वाटला. या ठिकाणी गृहप्रकल्पांची अत्यंत चांगल्या प्रकारे माहिती आम्हाला मिळाली. तसेच आमचा देखील नाशिकमध्ये घर घेण्याचा विचार असून या संदर्भात शोध सुरू आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्हाला ही संधी उपलब्ध झाली आहे.

३ ) धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथून खास प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आलेले एलआयसी एजंट असलेले सतीश धाकड म्हणाले की, होमेथॉन प्रदर्शन बघण्यासाठी मी खास नाशिक शहरात आलो असून नाशिक शहर अत्यंत सुंदर असून येथील गृह प्रकल्प देखील छान आहेत, या शहरातील वातावरण अत्यंत आनंददायी आणि प्रसन्न आहे. त्यामुळे मला येथे घर घेण्याची इच्छा झाली आहे.
४ ) नाशिकच्या मखमलाबाद परिसरात राहणारे आणि एमआयडीसीत कार्यरत असलेले संतोष डुंबरे यांनी सांगितले की, प्रदर्शनाच्या जाहिराती बघून मी येथे आलो असून माझा देखील घर घेण्याचा विचार आहे होमेथॉन प्रदर्शन खूपच चांगले असून त्यातून मला खूप चांगल्या प्रकारे माहिती मिळाली आहे.

५ ) नाशिकरोड भागात एका खाजगी कंपनीत कार्यरत असलेल्या विद्याधर कुरकुरे यांनी सांगितले की, येत्या पाच वर्षात नाशिक शहरात बांधकाम व्यवसायामुळे तसेच गृहप्रकल्पामुळे खूपच मोठी प्रगती होणार आहे, असे दिसून येते. मुंबई-पुणे या मोठया शहरांमध्ये घरी खूपच महाग असून त्यामानाने नाशिक शहरात घरे स्वस्त थोडी वाटतात. तसेच या प्रदर्शनाच्या माध्यमातून मला दरवाजे (डोअर ) निर्माण करणाऱ्या आमच्या कंपनीची प्रचार करता आला. होमेथॉन प्रदर्शनामुळेच बांधकामांसंबंधीच्या अन्य उद्योग व्यवसायातील व्यवसायाला देखील मोठी चालना मिळत आहे.
६ ) आदित्य बिर्ला फायनान्स कंपनीमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी मोहित बोरसे आणि तय्यब चाऊस यांनी प्रदर्शनाबद्दल अत्यंत चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तसेच आवास फायनान्स कंपनीमधील पुष्पक कासार यांनीही प्रदर्शनासंदर्भात छान प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Homethon Property Exhibition Last Day Tomorrow
Real Estate

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अभिनेत्री तुनिषा शर्माची शुटींगवेळी आत्महत्या; सहकलाकाराच्या मेकअप रुममध्ये घेतला गळफास

Next Post

क्षेत्रफळ तब्बल २ लाख ४० हजार चौमीटर…. गिनीज बुकात नोंद…. हे आहे भारतातील अधिकृत सर्वात मोठे मंदिर

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

doctor
राष्ट्रीय

या संतनगरीत होणाऱ्या राष्ट्रीय महाआरोग्य मेळाव्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना निमंत्रण

सप्टेंबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींसाठी लाभदायक दिवस, अर्थप्राप्ती होईल, जाणून घ्या, शुक्रवार, १२ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 11, 2025
Governance 1 1920x1248 1
संमिश्र वार्ता

‘इज ऑफ लिव्हिंग’ सुधारण्यासाठी राज्य शासनाचे आणखी एक पाऊल पुढे…हे पोर्टल होणार कार्यान्वित

सप्टेंबर 11, 2025
IMG 20250911 WA0337 1
स्थानिक बातम्या

हाय्रॉक्स मुंबई आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाशिकच्या स्ट्राईकिंग स्ट्रायडर्सचा चमकदार विजय

सप्टेंबर 11, 2025
image005V4IZ
संमिश्र वार्ता

सेनादलांतील या दहा महिला अधिकारी नऊ महिन्यांत २६ हजार सागरी मैलांचा प्रवास पूर्ण करणार…

सप्टेंबर 11, 2025
HYRYDER LE car 1 1
संमिश्र वार्ता

टोयोटा किर्लोस्‍कर मोटरकडून नवरात्री निमित्त ही ऑफर…१ लाख रूपयांहून अधिक फायदा

सप्टेंबर 11, 2025
ASHTAVINAYAK 2 1024x682 1
राज्य

अष्टविनायक विकास आराखडा….उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले हे निर्देश

सप्टेंबर 11, 2025
crime 88
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया भागात चार घरफोड्या…तीन लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

सप्टेंबर 11, 2025
Next Post
Delhi Akshardham e1671881890897

क्षेत्रफळ तब्बल २ लाख ४० हजार चौमीटर.... गिनीज बुकात नोंद.... हे आहे भारतातील अधिकृत सर्वात मोठे मंदिर

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011