पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिंदे बहाल केले आहे. पुणे येथील कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाने ‘दूध का दूध और पानी का पानी’ केले. ‘सत्यमेव जयते’ हे सूत्र महत्त्वाचे ठरले असल्याचे सांगत त्यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
तीन दिवसांपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणारे अमित शाह शनिवारचा नागपूर येथील दौरा आटपून पुण्यात पोहोचले. येथे मोदी @ 20 पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. याच कार्यक्रामात त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे एकप्रकारे स्वागत केले. आता महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व लोकसभा मतदार संघाच्या विजयसाठी संकल्प करा, असे आव्हान त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. त्यांनी यावेळी ‘भारत माता की जय’च्या घोषणाही दिल्या.
https://twitter.com/AmitShah/status/1627012434727960577?s=20
तेव्हा सर्व मंत्री स्वतःला पंतप्रधान मानायचे
अमित शाह यांनी यूपीए सरकारवर निशाणा साधला. २००४ ते २०१४ या कालावधीत देशात यूपीएचे सरकार होते. या सरकारमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी काहीही निर्णय घ्यायचा असेल तर धोरण लकवा झाला होता. तत्कालीन सरकारमधले सर्व मंत्री स्वतःला पंतप्रधान समजत होते आणि पंतप्रधान असलेल्या मनमोहन सिंह यांना कुणीही पंतप्रधान समजत नव्हते, या शब्दात त्यांनी टीकास्त्र डागले.
विदेशात सन्मान नव्हता
अमित शाह म्हणाले की, यूपीए सरकारच्या काळात दहशतवादी रोज आपल्यावर हल्ला करू लागले होते. लष्कराच्या जवानांना त्रास दिला जात होता. विदेशातही आपल्या देशाच्या पंतप्रधानांना सन्मान नव्हता. २०१४ च्या निवडणुका लागल्या तेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार होते. त्यावेळी मोदी लाट आली आणि संपूर्ण देशाने मोदींना निवडून दिले. २०१४ मध्ये जेव्हा भाजपाचे सरकार आल्यापासून त चांगले परिवर्तन देशात झाले असल्याचे शाह म्हणाले.
https://twitter.com/AmitShah/status/1626972966780284929?s=20
Home Minister Amit Shah Reaction on Election Commission Order